एक्स्प्लोर

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'शांतीनिकेतन' ठरला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, मिळालं सुवर्णकैलास पारितोषिक

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाला फराह खान उपस्थित होती.

छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत सगळे ठीक होत नाही तोपर्यंत पराभव न पत्करता लढत राहिले पाहिजे. विशेषत: जिथे इच्छा आणि सकारात्मकता असते तिथे मार्ग मिळत असतो, असे प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केले. यावेळी महोत्सवातील यंदाचे सुवर्णकैलास पारितोषिक शांतीनिकेतन या चित्रपटास प्रदान करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक दिपांकर प्रकाश यांनी हा सन्मान स्वीकारला.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (१९ जानेवारी) छ्त्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. 

यावेळी, ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, प्रोझोनचे केंद्र संचालक कमल सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिग्दर्शक फराह खान म्हणाल्या, आज मला या महोत्सवात सहभागी होऊन मनस्वी आनंद झाला आहे. हा महोत्सव मराठवाड्यात अत्यंत तळमळीने आयोजित केला जात असून या माध्यमातून या भागातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळाले आहे, हे ऐकून मी तत्काळ यामध्ये सहभागी होण्यास होकार दिला.

महोत्सवाबद्दल प्रचंड आवड असणारे प्रेक्षक मी येथे पाहिले. या भागात अनेक प्रतिभासंपन्न कलाकार आहेत. मी पहिल्यांदा अशा महोत्सवात सहभागी झालो आहे, जिथे मी एकही चित्रपट पाहिला नाही. याचे कारण म्हणजे खूप व्यस्ततेत हे पाच दिवस गेले. मात्र, सर्व मास्टर क्लास आणि डिस्कशन मी ऐकली आणि त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर पद्मश्री रसूल पूकुट्टी म्हणाले, मराठवाड्यासारख्या भागामध्ये हा चित्रपट महोत्सव होत आहे, ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे. हा महोत्सव इतका यशस्वी होण्यामध्ये येथील प्रेक्षकांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विषेशकरून येथील प्रेक्षक चित्रपटांवर प्रचंड प्रेम करणारे आहेत.

महोत्सवाचे पाच दिवस कसे गेले हे कळाले नाही. मी प्रेक्षक, परीक्षक, दिग्दर्शक म्हणून आपल्यासमवेत काम करीत असताना मनापासून आनंद झाला. सर्व चित्रपटांसह मास्टरक्लास'ला ही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो, असे महोत्सव संचालक सुनील सुकथनकर यावेळी म्हणाले.

महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, नांदेड ते न्यूयॉर्कपर्यंतच्या ३० शहरातून प्रेक्षकवर्ग या महोत्सवात सहभागी झाला होता. २४ देशांतील सिनेमे या महोत्सवात प्रेक्षकांना पाहायला मिळाले. वय वर्षे १८ ते ८५ वर्षातील प्रेक्षक सिनेमा या महोत्सवात पाहत होती. अनेक दिग्दर्शकांचे या महोत्सवात आयोजकांच्या भूमिकेत असणे, हे या महोत्सवाचे वेगळेपण आहे.

आत्ताच मी पुणे आणि मुंबई येथील चित्रपट महोत्सव पाहून आलो आहे.  आज अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास भेट देऊन येथील प्रेक्षकांचा उत्साह पाहिला. हा महोत्सव तसभुरही पुणे - मुंबईच्या महोत्सवापेक्षा कमी नाहीये. शासन अशा चित्रपट महोत्सवाला कायम सहकार्य करत आले असल्याचे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यांनी सांगितले.

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने ‘हे विश्वची माझे घर’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, छत्रपती संभाजीनगर शहराला जागतिक सांस्कृतिक चळवळींशी जोडण्याचं काम गेल्या ९ वर्षांत सातत्याने केलं आहे. या महोत्सवात सादर झालेल्या चित्रपटांपैकी एखादा सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. या वर्षी सई परांजपे यांनी आपल्या ८७ व्या वर्षी महोत्सवाचा सन्मान स्वीकारला. त्यांचा उत्साह पाहून हे प्रकर्षाने जाणवलं की, सिनेमा माणसाला केवळ मनोरंजन देत नाही, तर रसरसून जगण्याचं बळही देतो, असे अध्यक्षीय समारोप करताना एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी सांगितले.

महोत्सवात ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर रसूल पूकुट्टी यांचा ‘ओट्टा’ हा चित्रपट दाखविण्यात आला ‘फूल का छंद’ हा माहितीपटही दाखविण्यात आला. अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक फराह खान यांच्या मास्टरक्लास’ला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिग्दर्शक मोहम्मद रसुल यांचा ‘दि सिड ऑफ दि सॅक्रीड फिग’ हा सिनेमा महोत्सवाची समारोप फिल्म म्हणून दाखवण्यात आली.

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘एमजीएम इंस्पायर’ या न्यूजलेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक जयप्रद देसाई व प्रियंका शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शिव कदम यांनी केले.

१० व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पारितोषिक विजेत्या चित्रपटांची/व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे आहेत - 

१. सुवर्ण कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट) : शांतीनिकेतन
दिग्दर्शक – दिपांकर प्रकाश
स्वरूप : १ लक्ष रुपये आणि सुवर्ण कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

२. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेता - भारतीय चित्रपट ) : नीरज सैदावत
चित्रपट: शांती निकेतन | दिग्दर्शक: दीपांकर प्रकाश
स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

३. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री - भारतीय चित्रपट ) : भनिता दास
चित्रपट: विलेज रॉकस्टार्स २ | दिग्दर्शक: रीमा दास
स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

४. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट पटकथा - भारतीय चित्रपट ) : सुभद्रा महाजन
चित्रपट: सेकंड चान्स
स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

५. स्पेशल ज्यूरी मेन्शन  (चित्रपट ) :
विलेज रॉकस्टार्स २
दिग्दर्शक: रीमा दास

६. स्पेशल ज्यूरी मेन्शन ( अभिनेत्री) : नंदा यादव
चित्रपट: शांती निकेतन | दिग्दर्शक: दीपांकर प्रकाश

७. बेस्ट शॉर्ट फिल्म (मराठवाडा स्पर्धा) :
ठोकळा
दिग्दर्शक: वैभव निर्गुट
स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

८.  एमजीएम शॉर्ट फिल्म स्पर्धा (बेस्ट शॉर्ट फिल्म ) : जाणीव
दिग्दर्शक: स्वप्नील सरोदे
स्वरूप : २५००० रुपये आणि रौप्य कैलास स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र  

९. फ्रिप्रेसी इंडिया अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : इन दि आर्मस ऑफ दि ट्री
दिग्दर्शक – बबाक खाजेपाशा

१०. ऑडियन्स चॉईस अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : सवाना अँड द माउंटन
दिग्दर्शक: पाओलो कार्नेरो

हेही वाचा :

वडिलांचं पुष्पा-2 ला हिट करण्यात मोठं योगदान, पण लेक राशा थडानीचं स्वप्न राहणार अधुरंच?

Prajakta Mali : फुलवंतीचा ग्लॅमरस लूक; थ्री पिस ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Embed widget