एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या संसर्गात ‘व्हेंटिलेटर’ व्हेंटिलेटवर नाही!

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका नाटक आणि सिनेमांनाही बसला. मात्र, या सर्वात ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमावर फारसा फरक पडला नाही. ‘व्हेंटिलेटर’ला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या आठवड्यात जोरदार कमाई करणारा ‘व्हेटिंलेटर’ने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवला.
विशेष म्हणजे ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टीक मनी इत्यादी पर्यायांचा वापर करुन प्रेक्षक ‘व्हेंटिलेटर’चा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे व्हेंटिलेटरने गेल्या 11 दिवसांत तब्बल 11 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
“व्हेंटिलेटरला मिळणारा प्रतिसाद हा आमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. मानवी भावना आणि कुटुंबव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षक भावूक तर होतच आहेत शिवाय त्यामध्ये स्वतःचा शोध घेत आहेत हे विशेष.”, अशी प्रतिक्रिया निर्मात्या डॉ. मधू चोप्रा यांनी दिली.
आशुतोष गोवारीकर, सतीश आळेकर जितेंद्र जोशी,सुकन्या कुलकर्णी, सुलभा आर्या, निखिल रत्नपारखी यांसारख्या अनुभवी आणि हरहुन्नरी अभिनेत्यांबरोबरच जवळपास सत्तरच्या वर कलाकारांच्या बहारदार अभिनयाने सजलेल्या ‘व्हेंटिलेटर’ साकारण्यात आले आहे. या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल्सने केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
