एक्स्प्लोर

Entertainment News : 25 कोटींचं बजेट अन् 300 कोटींची कमाई; ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे अभिनेता रातोरात बनला स्टार

Entertainment News : लो बजेटमध्ये बनलेल्या एका चित्रपटाने बजेटपेक्षा नऊ पटीने जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली.

Box Office Collection : आजकाल बिग बजेट चित्रपटांचा ट्रेंड असून त्या चित्रपटाकडून तशा कमाईचीही अपेक्षा केली जाते. अनेक बिग बजेट चित्रपट बंपर कमाई करत सुपरहिट ठरतात, तर काही बिग बजेट चित्रपट सपशेल फेल ठरतात. अनेक चित्रपट तर त्याच्या खर्चाएवढीही कमाई करण्यात अपयशी ठरतात. दरम्यान, असे काही चित्रपट असतात जे अपेक्षा नसताना चित्रपटाच्या बजेटपेक्षा अधिक पटीने कमाई करतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक चित्रपट आहेत, जे लो बजेटमध्ये तयार झाले, पण त्यांनी विक्रमी कमाई केली.  

25 कोटींचं बजेट अन् 300 कोटींची कमाई

असा एक बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने निर्मात्यांना भरपूर फायदा मिळवून दिलाच, त्याशिवाय अभिनेत्याचं करियरही सेट केलं. 2019 मध्ये आलेल्या एका चित्रपटाने बजेटच्या नऊ पटीने अधिक कमाई करत विक्रम रचला. हा चित्रपट 11 जानेवारी 2019 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात कमाईची अपेक्षा नव्हती. आदित्य धार लिखित आणि दिग्दर्शित पहिल्याच चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवा पायंडा आणि नवे रेकॉर्ड रचले. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला होता. 

ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे अभिनेता रातोरात बनला स्टार

लष्करावर आधारित या चित्रपटाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग प्रचंड ट्रेंडमध्ये होते. या चित्रपटामुळे अभिनेता विकी कौशल याला खरी प्रसिद्धी मिळाली. 2019 मध्ये आलेल्या या चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीमधील पदार्पणाच्या चार वर्षानंतर विकी कौशलला स्टारडम मिळवून दिलं. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं नाव आहे उरी : द सर्जिकल स्ट्राईक. लेखक-दिग्दर्शक आदित्य धारच्या उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. हा चित्रपट पाहून आजही प्रेक्षक भावूक होतात. उरी चित्रपटातील 'हाऊज द जोश, हाय सर' हा डायलॉगही प्रचंड चर्चेत होता. 

या चित्रपटामुळे विकी कौशल बनला स्टार

सत्य घटनांवर आधारित चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची मिळाली आहे आणि त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'. विक्की कौशलने 'उरी' चित्रपटात मेजर विहान सिंह शेरगिलची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये उरी हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट होता. भारतीय लष्कराने 28 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला आणि या चित्रपटाने त्याला स्टारडम मिळाली. या चित्रपटात 2016 च्या उरी हल्ल्याची खरी घटना काल्पनिक स्वरूपात मांडण्यात आली होती. या चित्रपटामुळे विकीचे नशीब उजळले.

कमी बजेटचा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील

आयएमडीबीच्या (IMDb Report) रिपोर्टनुसार, Sacnilk नुसार, 25 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 359.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटामध्ये विकी कौशलशिवाय यामी गौतम, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी आणि परेश रावल हे देखील दिसले होते. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम नोंदवले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jacqueline Fernandez : जेलमधून सुकेश चंद्रशेखरचं 'बेबी' जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर, रोमँटिक अंदाजात दिलं खास गिफ्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget