Jacqueline Fernandez : जेलमधून सुकेश चंद्रशेखरचं 'बेबी' जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर, रोमँटिक अंदाजात दिलं खास गिफ्ट
Sukesh Chandrasekhar and Jacqueline Fernandez : तुरुंगातून असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक प्रेम पत्र लिहिलं आहे.
Sukesh Chandrasekhar Love Letter to Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत नाव जोडलं गेल्यापासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडचणीत सापडली आहे. 200 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुगांत आहे. तुरुंगातून त्यानं सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) एक प्रेम पत्र लिहिलं आहे. सुकेशने जेलमधून जॅकलिनला प्रेम पत्र लिहिण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही त्याने तिला लव्ह लेटर पाठवले आहेत.
जेलमधून सुकेशचं 'बेबी' जॅकलिनला लव्ह लेटर
सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून अटकेत आहे. सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) आर्थिक गैरव्यवहार करत त्या पैशातून अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू भेट दिल्या होत्या सुकेशचं नाव अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत जोडण्यात येत आहे. आता जेलमधून सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर लिहिलं आहे.
रोमँटिक अंदाजात दिलं खास गिफ्ट
सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिससाठी पुन्हा एकदा प्रेमपत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेश जॅकलिनचं कौतुक करताना दिसत आहे. सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, 'माझी प्रिय जॅकलिन, मी तुझे नवीन फोटो पाहिले. देवा, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं? बेबी, तू खरच सुंदर आहेस. या नोटवर आज मी तुम्हाला दोन गोष्टी समर्पित करत आहे. सुकेशने 'रोमँटिक अंदाजाता जॅकलिनला बॉलिवूड चित्रपटातील गाणं डेडीकेट केलं आहे.
प्रेम पत्रात काय लिहिलंय?
महाठग सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की, 'बेबी, सध्या माझा मूड कसाही असला तरी, मला तुला एक गाणं डेडिकेट करायची इच्छा आहे. ते गाणं आहे 'लापता लेडीज' चित्रपटामधील 'सजनी'. बेबी, या गाण्याची प्रत्येक ओळ तुझ्यासाठी आहे. तुझ्याशिवाय किंवा तुझ्याशी न बोलता माझा दिवस आणि रात्री कसे जातात, हे मला खरोखरच कळत नाही. मला तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या फोटोची एक अप्रतिम कलाकृती सादर करायची आहे. तुला माहीत आहे का या कलाकृतीत विशेष काय आहे, हे माझ्या स्वप्नातून थेट साकारलेले, प्रत्यक्षात आणलेली कलाकृती आहे. हे सर्व तुझ्यासाठी आहे. मला आशा आहे की, तुला ते आवडेल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :