Urfi Javed: उर्फीनं चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; ट्वीट शेअर करत म्हणाली, "चित्रा अशी कशी गं तू..."
सध्या उर्फी (Urfi Javed) ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं (Urfi Javed) चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली. सध्या उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
उर्फी जावेदचं ट्वीट
' उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास' असं ट्वीट उर्फीनं शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. उर्फीच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केलं असून काही नेटकऱ्यांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केलं आहे.
Uorfi Javed la dila traas
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023
Chitra asi Kashi tu ga Saas
उर्फीनं दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'चित्रा ताई मेरी खास है, फ्यूचर में होने वाली सास है' उर्फीच्या या ट्वीटनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Chitra tai Meri khaas hai
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023
Future me hone wali saas hai
चित्रा वाघ यांनी देखील ट्वीटच्या माध्यमातून उर्फीवर निशाणा साधला होता. 'मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.' असं ट्वीट काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी केलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: