एक्स्प्लोर

South Movies : साऊथचे 'हे' पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज! जमवणार 1000 कोटींचा गल्ला; तुम्ही कोणता पाहणार?

South Movies : कमाईच्या बाबतीत साऊथचे चित्रपट बॉलिवूडपटांना टक्कर देतात. येत्या काही दिवसांत पाच साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत.

South Movies : सिनेप्रेमींमध्ये सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची (South Movies) चांगलीच क्रेझ आहे.'बाहुबली','केजीएफ','पुष्पा','आरआरआर' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून साऊथ इंडस्ट्री खूपच लोकप्रिय झाली आहे. चाहते आता दाक्षिणात्य चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. कमाईच्या बाबतीतही दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडपटांना टक्कर देतात. येत्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. या आगामी साऊथ चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. साऊथचे पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज आहेत. रिलीज होताच हे चित्रपट 1000 कोटींचा गल्ला जमवू शकतात. 

1. 'पुष्पा 2' (Pushpa 2) : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' या चित्रपटाने हिंदी पट्टीत चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी 'पुष्पा 2'बद्दल घोषणा केली आहे. अल्लू अर्जुनसह या चित्रपटात रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगबाबत नेटफ्लिक्ससोबत बोलणी झाली आहेत. 250 कोटी रुपयांत या चित्रपटाचं डील झालं आहे.

2. कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) : 'बाहुबली' फेम प्रभास अभिनीत 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाची 600 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 375 कोटी रुपयांत या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेले आहेत. तेलुगू, तामिळसह विविध भाषांमध्ये हा पॅन इंडिया चित्रपट रिलीज होणार आहे. 

3. देवारा (Devara) : ज्युनिअर एनटीआरचा बहुचर्चित 'देवारा' हा चित्रपट याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. 'देवारा' या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसह सैफ अली खान आणि जान्हवी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे 155 कोटी रुपयांत ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत.

4. गेम चेंजर (Game Changer) : 'आरआरआर' या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात राम चरणसोबत कियारा आडवाणीदेखील दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांत या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. 

5. ओजी (OG) : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण 'ओजी' या चित्रपटाच्या माध्यमातून धमाका करण्यास सज्ज आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने 92 कोटी रुपयांत या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. 

संबंधित बातम्या

Bollywood Actress : अकाऊंटमध्ये 10 रुपयेही नव्हते; पतीपासून विभक्त झाल्यानंतर बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची अशी झालेली अवस्था

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Embed widget