एक्स्प्लोर

Upcoming OTT Releases: बॉलिवूड Wives OTT वर दाखवणार पर्सनल Life ची झलक, वकील बनून अदा शर्मा धुमाकूळ घालणार

OTT वर दर आठवड्याला वेगवेगळ्या जॉनरचे शो आणि चित्रपट प्रदर्शित केले जातात. हा आठवडा मनोरंजनानं भरलेला असेल. या आठवड्यात अनेक नवनव्या सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय काही इंग्रजी आणि इतरही अनेक भाषांचे शो आणि चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

Upcoming OTT Releases: ऑक्टोबरच्या मीड विकमध्ये इंग्रजी, कोरियन, हिंदी, बंगाली, दाक्षिणात्य भाषांमधील अनेक शो आणि चित्रपटांची मेजवाणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हीही वेगळा कंटेट पाहण्याचा विचार करत असाल, तर ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) तुमची वाट पाहत आहेत. 

ॲक्शन, ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलनं भरलेला भरपूर कंटेंट या आठवड्यात OTT वर रिलीज केला जाईल. विशेषत: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून मनोरंजनाचा मसाला मिळणार आहे. तर या आठवड्याच्या दर्जेदार सीरिजच्या यादीमध्ये कोणते वेब शो आणि चित्रपट समाविष्ट आहेत, हे सविस्तर जाणून घेऊयात...

रिता सन्याल (Reeta Sanyal)

अभिनेत्री अदा शर्माची 'रीता सन्याल' ही नवी सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हा एक इन्वेस्टिगेटिव्ह  कॉमेडी ड्रामा आहे, ज्यामध्ये अदा शर्मा एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रिलीज डेट : 14 ऑक्टोबर
कुठे पाहाल : डिझ्ने हॉटस्टार (Disney+ Hotstar)

द लिन्क्लिन लॉयर- सीजन 3 (The Lincoln Lawyer: Season 3 )

द लिन्क्लिन लॉयर- सीजन 3... हा प्रसिद्ध कोर्टरूम ड्रामा आहे. तिसऱ्या सीझनमध्ये दाखवलं जाईल की, मिकी प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक कठीण प्रसंगांचा सामना करणार आहे. शोमध्ये दाखवलं जाईल की, मिकीच्या आयुष्यात खरा भूकंप तेव्हा येतो, ज्यावेळी त्याची एक्स वाईफ मॅगी परत येते. 

रिलीज डेट: 17 ऑक्टोबर
कुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)

आऊटसाईड (Outside)

ही एक सायकॉलॉजिकल हॉरर फिल्म आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की, एका कुटुंबावर काही झॉम्बी अटॅक करतात. त्यानंतर ते एका अशा फार्महाऊसमध्ये जातात, जिथे त्यांची झॉम्बीपासून सुटका होईल, असं त्यांना वाटतं. पण असं अजिबात होत नाही. पुढे काय घडतं? ते तुम्हीच पाहा... 

रिलीज डेट : 17 ऑक्टोबर
कुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)

फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स (Watch Fabulous Lives of Bollywood Wives)

कॅमेऱ्यापासून दूर राहणाऱ्या बॉलिवूड स्टार पत्नीचं आयुष्य कसं असतं? याची झलक देणाऱ्या 'फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्ज' या शोचा तिसरा सीझन या आठवड्यात सुरू होणार आहे. या सीझनमध्ये रिद्धिमा कपूर साहनी, कल्याणी साहा चावला आणि शालिनी पासी यांचाही समावेश असेल.

रिलीज डेट: 18 ऑक्टोबर 
कुठे पाहाल: नेटफ्लिक्स (Netflix)

स्नेक्स अँड लँडर (Snakes and Ladders)

'स्नेक्स अँड लँडर' तमिल वेब सीरीज आहे, जिचा जॉनर कॉमेडी आहे. त्याची कथा अशा मित्रांवर आधारित आहे, जे अचानक एका संकटात अडकतात. तिथून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे, इच्छा नसतानाही त्यांना सर्व अडचणींचा सामना करावा लागेल. जसजसा तो प्रगती करतो, तसतसा तो स्वतःबद्दल अधिक शिकतो.

रिलीज डेट : 18 ऑक्टोबर 
कुठे पाहाल: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Upcoming Bollywood Movies: यशराज फिल्म्सनं कंबर कसली, 'हे' 5 मोठे चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार, बॉलिवूडची दिशा बदलणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Vidhan Sabha Election : 84 होवो, 90 होवो हे म्हातारं काही थांबत नाहीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  15  ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam : त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
त्यांनी शंभरी गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? हे सांगावं; रामदास कदमांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
Maharashtra News Live Updates : दुपारी 12 वाजता 7 आमदारांचा शपथविधी, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
Embed widget