एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुखची सुरक्षा धोक्यात; मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले 'मन्नत'मध्ये

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. दरम्यान शाहरुखच्या 'मन्नत' (Mannat) बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी (2 मार्च) रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. 

'मन्नत'ची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भिंत तोडणारे तरुण गुजरातमधील असून त्यांना त्यांना मुंबई पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरुणांचा मोबाईलही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे. 

 

आरोपी शाहरुखचे जबरा फॅन, भेटण्यासाठी गुजरातहून मुंबईत

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण शाहरुखचे मोठे चाहते असून त्याला भेटण्यासाठी ते खास गुजरातहून आले आहेत. शाहरुखचा भेटण्याची त्यांची खूप इच्छा आहे. चौकशीदरम्यान तरुणांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

विनापरवाना मन्नतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे एका सूत्राने ईटाइम्सला माहिती देत सांगितले, गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' या सिनेमाचं शूटिंग करत होता. तो मध्यरात्री आला तेव्हा 'मन्नत'च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आत लपून बसलेल्या दोन्ही तरुणांना पकडलं. 

गौरी खानवर गुन्हा दाखल

दुसरीकडे शाहरुखची पत्नी गौरी खानवर लखनौच्या एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी ही तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रॅंड अॅंबेसेडर असून तिच्या जाहिरातीने प्रभावित होऊन मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने लखनौत 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता. पण पूर्ण पैसे दिल्यानंतरही त्यांना फ्लॅट मिळाला नसल्याने त्यांनी गौरी खानवर फसवणुकीचा आरोप केला आहे. अद्याप याप्रकरणी गौरी खानने प्रतिक्रिया दिलेली नाही. 

संबंधित बातम्या

Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget