Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gauri Khan FIR : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या (Lucknow) सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गौरी खान (Gauri Khan) तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड (Tulsiani Constructions And Developers Pvt. Ltd) या कंपनीची ब्रँड अॅंबेसेडर (Brand Ambassador) आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अंतर्गत लखनौमध्ये 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता. पण 86 लाख रुपये घेतल्यानंतर तो फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचा आरोप किरीट यांनी केला आहे.
गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रँड अॅंबेसेडर असून तिच्या जाहिरातीने प्रभावित होऊन फ्लॅट घेतला असल्याचा दावा किरीट यांनी केला आहे. फसवणुकीनंतर किरीट यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन्सचे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी आणि ब्रँड अॅंबेसेडर गौरी खानवर गुन्हा दाखल केला आहे.
An #FIR was registered against Bollywood actor Shah Rukh Khan wife,Gauri Khan...
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) March 2, 2023
Case registered under IPC section 409 (criminal breach of trust).
Case was filed by Jaswant Shah, a resident of #Mumbai@gaurikhan @Uppolice @iamsrk pic.twitter.com/eS6W70kc5g
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, गौरी खान 2015 साली 'तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड' या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर होती. त्यावेळी त्यांच्या या प्रोजेक्टचं ती खूप प्रमोशन करत होती. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी सेक्टर - 1 पॉकेट डीमध्ये फ्लॅट बांधले जात असल्याची माहिती गौरीने जाहिरातीच्या माध्यमातून दिली होती. या जाहिरातीमुळे ते प्रभावित झाले आणि लगेचच 86 लाखांचा हा फ्लॅट विकत घेतला. त्यावेळी 2016 मध्ये पझेशन मिळेल असे सांगण्यात आले होते. पण पूर्ण पैसे घेतल्यानंतरही त्यांना अद्याप फ्लॅटची चावी मिळालेली नाही.
गौरी खानच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
गौरी खानने अद्याप गुन्हा दाखल प्रकरणी भाष्य केलेलं नाही. तिने नुकतीच मर्सिडीज बेंजची नवीन गाडी (Mercedes-Benz) विकत घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने महागड्या गाडीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. गौरी तिच्या स्टायलिश लुकसह फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. आज गौरी एक लोकप्रिय इंटिरियर डिझायनर आहे.
संबंधित बातम्या