एक्स्प्लोर

Dear Malley : गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’चा ट्रेलर आऊट, 1 जुलैला सिनेमा होणार रिलीज

Dear Malley : वडील -मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा ‘डियर मॉली’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Dear Malley : सिनेसृष्टीला अनेक उत्तमोत्तम सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (Gajendra ahire) पुन्हा एकदा एक अनोखा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. गुवाहाटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ने सन्मानित करण्यात आलेला ‘डियर मॅाली’ (Dear Malley) हा सिनेमा 1 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून हा एक नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा आहे. 

सिनेमाचे कथानक काय? 

ट्रेलरमध्ये आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी सातासमुद्रापार पोहोचलेली मॅाली दिसत आहे. जिचा खूप धडपडीचा प्रवास सुरू आहे. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्या माणसांना पाठीशी ठेवून परदेशी निघून गेलेल्या बाबांना शोधण्यात मॅाली यशस्वी होणार का? तिला दिलेल्या पत्रांमध्ये तिच्या मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? अशी अनेक रहस्यांचा उलगडा 1 जुलैला होणार आहे. या सिनेमात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वडील आणि मुलीच्या नात्यातील अव्यक्त प्रेम यात पाहायला मिळत आहे. 

सिनेमासंदर्भात दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले,"ही कथा आहे नवरा - बायकोची. ही कथा आहे वडील -मुलीच्या नात्याची. ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा मला हवी होती तशीच आहे. विशेष कौतुक आलोक आणि मृण्मयीचे कारण त्यांच्या वयापेक्षा जास्त वयाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. या भूमिकेला त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. या सिनेमातील गाणीही परिस्थितीला साजेसी अशीच आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण स्विडनमध्ये झाले आहे. त्यामुळे या सिनेमात स्विडीश संस्कृतीही डोकावते. या सिनेमासाठी हव्या असलेल्या सर्व गोष्टी मला मिळाल्या. मात्र त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत करावी लागली". निश्चल प्रॉड्क्शन्स निर्मित या सिनेमाची निर्मिती प्रवीण निश्चल व व्हिनस यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ 1 जुलैला होणार प्रदर्शित; अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले साकारणार प्रमुख भूमिका

Rainbow : रंगाची उधळण करणाऱ्या 'रेनबो'च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात; क्रांती रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
Mitali Sharma: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल
बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget