Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: प्रसिद्ध गायकानं नुकताच रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ ऑपरेशन थिएटरमधला आहे. ऑपरेशन थिएटरमधल्या बेडवर सोनू निगम दिसत आहेत.

Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सोनू निगम (Sonu Nigam) म्हणजे, भारतातील प्रसिद्ध गायकांपैकी (Singer) एक नाव. आपल्या आवाजानं कित्येक रसिक-प्रेक्षकांची मनं या दिग्गज गायकानं जिंकली आहेत. बॉलिवूडमधील (Bollywood News) कित्येक गाणांना सोनू निगम यांनी आवाज दिला आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. अशातच दिग्गज गायकानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यावरुन त्याच्या आयुष्यात गाणं आणि म्युझिकला किती महत्त्व आहे, हे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकतो बरं का...
प्रसिद्ध गायकानं नुकताच रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ ऑपरेशन थिएटरमधला आहे. ऑपरेशन थिएटरमधल्या बेडवर सोनू निगम दिसत आहेत, आसपास डॉक्टर आणि नर्स आहेत. हा व्हिडीओ सोनू निगम यांच्या शस्त्रक्रियेदरम्यानचा आहे. शस्त्रक्रिया सुरू असतानाच सोनू निगम आपल्या डॉक्टरांसाठी आणि वैद्यकीय पथकासाठी मोहम्मद रफी यांचं एक अजरामर गाणं गाताना दिसतायत.
सोनू निगम यांचा रुग्णालयातला VIDEO (Sonu Nigam Video Viral)
सोनू निगम रुग्णालयातील स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते ऑपरेशन थिएटरमधल्या बेडवर पडून असल्याचं दिसतंय. ते 'ऑपरेटिंग थिएटर'मध्ये असल्याचं दिसतंय. डॉक्टरांकडून त्याच्या हातावर शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रियेच्या टेबलवर पडून असताना सोनू "सुहानी रात ढल चुकी है, ना जाने तुम कब आओगे...", हे दिग्गज दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचं गाणं गातायत. हे गाणं गात असतानाच डॉक्टर त्याच्या हातावरची शस्त्रक्रिया करत आहेत.
View this post on Instagram
सोनू निगम यांची चाहत्यांना चिंता (Singer Sonu Nigam Video From Hospital)
रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर करत सोनू निगम यांनी त्यासोबत एक कॅप्शन लिहिलंय. यात त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान प्रतिष्ठित डॉ. निलेश सातभाई आणि त्यांच्या उत्कृष्ट टीमसाठी केलेल्या एका अनियोजित परफॉर्मन्सचं वर्णन केलंय. वेदना होत असतानाही गाणं आणि संगीतात आनंद शोधणं, असं हे दृश्य आहे.
दरम्यान, रुग्णालयातील सोनू निगम यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, त्यांनी शस्त्रक्रियेचं कारण किंवा त्याला असलेल्या विशिष्ट वैद्यकीय समस्येबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांना रुग्णालयात पाहून चाहते चिंतेत आहेत आणि त्यांचे चाहते त्याच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















