Rainbow : रंगाची उधळण करणाऱ्या 'रेनबो'च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात; क्रांती रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेत
Rainbow : क्रांती रेडकरच्या आगामी 'रेनबो' सिनेमाच्या शूटिंगला आता लंडनमध्ये सुरुवात झाली आहे.

Kranti Redkar Rainbow Movie : 'रेनबो' (Rainbow) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असून तेव्हापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. लवकरच रंगांची उधळण करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'रेनबो'
'रेनबो' या सिनेमात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या सिनेमातदेखील प्रेक्षकांना विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा 'रेनबो' तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
View this post on Instagram
क्रांती रेडकर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. या सिनेमाविषयी क्रांती रेडकर म्हणाली,'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच सगळे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंग प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे".
'रेनबो' सिनेमासंदर्भात अक्षय बर्दापूरकर म्हणाले,"क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. 'रेनबो' हा असा सिनेमा आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या सिनेमाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल".
संबंधित बातम्या























