TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
आलिया भट्टचा बहुचर्चित गंगूबाई काठियावाडी सिनेमा शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने 9.50-10 कोटींची कमाई केली आहे.
ढोलिडानंतर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'झूमे रे गोरी' गाणं रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील आलियाच्या डॅशिंग स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील ढोलिडा गाणं देखील प्रदर्शित झाला होतं आता त्यानंतर 'झूमे रे गोरी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामधील आलियाच्या डान्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'च्या शूटिंगला सुरुवात
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा आगामी 'फायटर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. हृतिक-दीपिकासह अनिल कपूरदेखील 'फायटर' सिनेमात दिसणार आहेत.
'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार
बहुचर्चित 'अनन्या' नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. तर प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, करण बेंद्रे आणि सिद्धार्थ बोडके सहाय्यक भूमिकेत आहेत. सहा मार्च 2022 रोजी दुपारी साडे चार वाजता विले पार्लेतील नाट्यगृहात 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे.
'झिम्मा'ची सिनेमागृहात शंभरी
सिनेमागृहे सुरू झाल्यापासून बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमेदेखील मागे राहिलेले नाहीत. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेला झिम्मा हा पहिलाच सिनेमा आहे. या शर्यतीत बॉलिवूडचे अनेक सिनेमे असताना देखील 'झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले असून 15 व्या आठवड्यात पदार्पण केले आहे.
संबंधित बातम्या
Garjato Marathi : मराठी भाषा दिनानिमित्त सादर होणार 'गर्जतो मराठी' विशेष कार्यक्रम
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकलेचं ट्वीट चर्चेत; म्हणाला, 'करण तुला 150 रूपये देतो, तू...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha