एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये आलिया मुख्य भूमिकेत

बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणनं हॉलिवूडमध्ये काम करून परदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच आलिया भट्टदेखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया ही हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गल गडोट सोबत स्पाय थ्रिलर चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक टॉम हार्पर हे करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

'अनन्या' सिनेमा  'या' दिवशी होणार प्रदर्शित

 बहुचर्चित 'अनन्या' सिनेमा अखेर 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी या सिनेमाची सकारात्मक टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे.  

केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा

महिला दिनी केदार शिंदेंनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'बाईपण भारी देवा' असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत. पण त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. केदार शिंदेंनी सोशल मीडियाद्वारे 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा केली आहे. 

तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या आगामी 'शाबास मिथू' सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'शाबास मिथू' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. खास महिला दिनानिमित्त या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये तापसीने हातात हेल्मेट आणि बॅट घेतलेली दिसत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. 

'द कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकांचा कपिल शर्मावर आरोप

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटाचे निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्क्रीनिंगला उपस्थित असणाऱ्या  प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या चित्रपटाचे प्रमोशन 'द कपिल शर्मा' शोमध्ये करण्याचा सल्ला चाहत्यांनी विवेक अग्निहोत्री यांना दिला. पण त्या चाहत्यांना उत्तर देत विवेक यांनी कपिलवर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

Man Udu Udu Zhala : सानिका आई होणार... पण दिपू घरच्यांना सांगणार का सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचं सत्य?

Majhi Tujhi Reshimgath : नेहाला भेटण्यासाठी यशची कसरत, दुधवाला बनुण जाणार घरी

Ott Web Series :  सस्पेन्स अन् सायकोलॉजिकल थ्रिलर; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या 'या' सीरिज नक्की पाहा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget