एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. सिनेमागृह सुरू झाल्यापासून बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे एका पाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमांनीदेखील त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. विकेंण्डला अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. गंगूबाई काठियावाडी, पावनखिंड, भीमला नायक आणि वालीमाई सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 

अभिज्ञा भावेच्या पतीची कॅन्सरशी झुंज

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिज्ञा आणि मेहुलचे हॉस्पिटलमधील फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मेहुलला कॅन्सरसोबत लढण्यात अभिज्ञा खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्याचे चाहते मेहुलला लवकरे बरे वाटावे अशी प्रार्थना करत आहेत. इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत अभिज्ञाने लिहिले आहे,'मला आयुष्यात अनेक मूर्ख भेटले मात्र, त्यामधील सर्वात मोठा मूर्ख कर्करोग आहे. माफ कर पण तु चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस'.

अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण

अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण झाली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"सर्वप्रकारे काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. पण आता प्रकृतीत सुधारणा होत आहे". श्रुतीने शेअर केलेल्या या पोस्टवर श्रुतीचे चाहते आणि कलाकारमंडळी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदींना केलं इम्प्रेस

टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. या भाऊ-बहिणीने आपल्या व्हिडीओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील इम्प्रेस केलं आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात किली पॉल आणि नीमा पॉल यांचे खूप कौतुक केले आहे. मोदी म्हणाले की,''दोघांनाही भारतीय संगीताची आवड आहे. भारतीय संगीताच्या त्यांच्या या आवडीमुळे ते खूप लोकप्रिय देखील झाले आहेत.''

लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला

हॉलिवुड सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक नताशा पूनावाला नुकतेच एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नताशा या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्या पत्नी आहेत. नताशा यांचे अनेक बॉलीवूड कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अभिनेत्री करीना कपूर खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांच्या गर्ल गँगमध्ये नताशा यांचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फॅट टू फिट अवतार, ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget