एक्स्प्लोर

Top 10 Web Series 2023 : 'फर्जी', 'द रेल्वे मॅन' ते 'काला पानी'; 'या' वेबसीरिजने गाजवलं सरतं वर्ष

Year Ender 2023 : 'फर्जी', 'दहाड','द नाईट मॅनेजर','ताली' ते 'काला पानी' अशा अनेक वेबसीरिजने 2023 हे वर्ष गाजवलं आहे. या सीरिजने घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे.

Top 10 Web Series 2023 : मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात अनेक चांगले सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. सिनेमांसह वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिजदेखील (Web Series) प्रदर्शित झाल्या. या सीरिजने घरबसल्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. 'फर्जी', 'दहाड','द नाईट मॅनेजर','ताली' ते 'काला पानी' अशा अनेक वेबसीरिजने 2023 हे वर्ष गाजवलं आहे. या सीरिजने घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे.

फर्जी

यंदाचं वर्ष अभिनेता शाहिद कपूरसाठी एकदम खास ठरलं आहे. कारण याच वर्षी रिलीज झालेल्या फर्जी या वेबसीरिजमधून त्यानं ओटीटीमध्ये पदार्पण केलं. शाहिद कपूर आणि विजय सेतुपथी अशी दक्षिण -उत्तर जुगलबंदी या सिरीज मध्ये पाहायला मिळाली.. फॅमिली मॅनसारख्या सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज चे दिग्दर्शक राज अॅण्ड डीके यांनी यावेळी विषय निवडला होता बनावट नोटांच्या रँकेटचा... केके मेनन आणि अमोल पालेकर यासारख्या दमदार अभिनेत्यांच्या भूमिकाही तितक्याच लक्षात राहणाऱ्या. एक मूळचा चित्रकार आपल्या कलेचा वापर नोटांच्या या बनावट धंद्यासाठी कसा चलाखीने करत जातो याची ही उत्कंठावर्धक कहाणी.

दहाड 

देशाला हादवणाऱ्या सायनाईड मोहन या सायको किलरच्या आयुष्यावर बेतलेली दहाड ही वेबसीरिज. सायनाईड मोहनने 2003 ते 2009 या कालावधीत 20 मुलींची गर्भनिरोधक गोळी देवून  हत्या केली. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आठ  एपिसोडमध्ये तितक्याच ताकदीने मांडलीय. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शर्मा, गुलशन देवय्या यांच्या सशक्त अभिनयाने सीरिजला आणखी प्रभावी केलंय. म्हणूनच आयएमडीबीमध्ये 7.6 रेटिंगसह या सीरिजने सोशल मीडियावरही वाहवाह मिळवली.

द नाईट मॅनेजर 

द नाईट मॅनेजरच्या जबरदस्त यशानंतर या सीरिजचा दुसरा भाग या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसरा सीझनही प्रचंड गाजला. खिळवून ठेवणारं कथानक, आशयाची प्रभावी मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय  यामुळे अल्पवधीतच ही मालिका चर्चेत आली. अनिल कपूरला नकारात्मक भूमिकेत पाहणं ही रसिकांसाठी ट्रीट आहे. या वेबसीरिजला आयएमडीबीमध्ये 7.6 रेटिंग मिळालेयत. 

ताली 

तृतीयपंथांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांचा  प्रेरणादायी प्रवास  उलगडणारी ताली ही वेबसीरिज. विशेष म्हणजे तृतीयपंथासाठी पहिला लढा देणाऱ्या मराठमोळ्या गौरी सांवत यांचा जीवनप्रवास पडद्यावर मांडलाय मराठमोळ्या टीमनंच... आणि तो काय ताकदीचा मांडलाय हे सांगण्यासाठी IMDB चे 9.3  हे रेटिंग्स पुरेसे आहेत. तालीच्या निमित्ताने दिग्दर्शक रवी जाधव आणि लेखक क्षितीज पटवर्धन यांनी याच वर्षात ओटीटीवर  पदार्पण झालं.

असूर 2

1 जून 2023 ला 'असूर 2' ही वेबसीरिज भेटीला आली आणि तीन वर्षांची प्रतीक्षा संपली. असूरच्या भरघोस यशानंतर आणखी एका नव्या असूराची एण्ट्री झाली आणि याही असूराला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पहिल्या सीझनमध्ये मांडलेला सायको थ्रिलर ड्रामा प्रेक्षकांना चांगला भावला त्यामुळे दुसऱ्या सीझनकडून अर्थातच अपेक्षा वाढल्या होता. आणि त्या पूर्ण करण्यात सीरिजच्या टीमला यश आलं. आठ भागांची ही सीरिज 8.5 रेटिंगसह टॉप वेबसीरिजच्या यादीत आहे.

स्कूप 

दिग्दर्शक हंसल मेहता यांची मच अवेटेड  स्कूप ही वेबसीरिज याच वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आली. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या स्कूप या वेबसीरिजला प्रचंड वाहवाह मिळाली. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सीरिजला पुरस्कारही मिळाला.  एका ब्रेकिंग न्यूजमुळे जिग्ना वोराच्या आयुष्यात आलेलं वादळ आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीचा तिचा संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अभिनेत्री करिष्मा  तन्ना ही भूमिका सीरिजमध्ये अक्षरश: जगलीय.. 

द रेल्वे मेन 

2023 च्या टॉप वेबसीरिजमध्ये स्थान मिळवणारी द रेल्वे मेन ही वेबसीरिज सरत्या वर्षात भेटीला आली. आणि अल्पवधीतच लोकप्रिय झाली. 1984 सालच्या भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर ही मालिका अत्यंत निर्भिडपणे भाष्य करते. सत्य घटनेवर आधारित असलेली ही सीरिज अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तितकीच खरी वाटते. म्हणून 8.5 रेटिंग असलेल्या या वेबसीरिजला अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. 

काला पानी 

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेता आशुतोष गोवारीकर यांच्या ओटीटी पदार्पणाचा मुहूर्त ठरला तो याच वर्षी.. ऑक्टोबर महिन्यात भेटीला आलेल्या काला पानी  या वेबसीरिजमधून गोवारीकर यांनी पदार्पण केलं आणि इथेही आपल्या कसदार अभिनयाने ठसा उमटवला. चित्त थरारक कथा आणि दमदार अभिनय यामुळे ही वेबसीरीज ट्रेडिंगमध्ये आहे. 

संबंधित बातम्या

Top 10 Television News : 'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण ते तेजश्री प्रधानचं दोन वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक; सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget