एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
 
'टाइमपास 3'ची कमाल; चार दिवसांत कमवला 4.36 कोटींचा गल्ला

'टाइमपास' आणि 'टाइमपास 2'च्या यशानंतर आता 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतेच या सिनेमाचे कलेक्शन समोर आले आहे. या सिनेमाने 4.36 कोटींची कमाई केली आहे. 

'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

 'शेर शिवराज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 

बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होत असताना सिनेमावर बहिष्कार मागणी होत आहे. अशातच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

गजेंद्र अहिरेंची 'साजिंदे' वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे.  चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि 'साजिंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली.

मराठी रॅपर ‘किंग जेडी’कडून ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना

मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव  उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे. 

कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये करीना उडवणार आमिरची खिल्ली

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खान  हे हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंजाबी गायक जानीची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि गीतकार जानीनं पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. जानीचं असं मत आहे की, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत, असंही त्याचं मत आहे. जानीनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. जानीनं पत्रात लिहिलं की, त्यानं आधीच आपले कुटुंब परदेशात शिफ्ट केले आहे आणि त्याच्या मॅनेजरच्या जीवाला देखील धोका आहे. 

'टकाटक 2' मधील 'लगीन घाई...' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'टकाटक 2' हा चित्रपट सध्या खूपच लाइमलाईटमध्ये आला आहे. मोशन पोस्टर, टिझर आणि टायटल साँग आल्यानंतर सर्वत्रच 'टकाटक 2' चीच चर्चा आहे. याच वातावरणात 'टकाटक २'मधील दुसरं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावणारं आणि चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारं असं हे गाणं सोशल मीडियावर अफलातून गाजत आहे. लाँच होताच या गाण्यानं तूफान हिट्स मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर संथच! चार दिवसांत कमावले अवघे इतके कोटी

'एक व्हिलन' चित्रपटाचा सिक्वेल 'एक व्हिलन रिटर्न्स'  नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या चित्रपटात जॉन अब्राहम , अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पाटनी अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरु आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. चार दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 26.56 कोटींवर गेली आहे.

दिया मिर्झाच्या भाचीचं निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं काल (01जुलै) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं तिच्या भाचीच्या निधनाची माहिती दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडेचं निधन झालं आहे. तान्यानं 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, एका कार अपघातामध्ये तान्याचं निधन झालं. दियानं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणारABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Ladki Bahin :लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचा लाभ बंद होणार?
Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ फाईव्हस्टार हॉटेल सोडून गिरगावच्या आश्रमात राहिले, रात्रभर जमिनीवर झोपले, काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
पंचतारांकित हॉटेल सोडून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा मुक्काम गिरगावच्या आश्रमात, हर्षवर्धन सपकाळ पदभार स्वीकारणार
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
"'ती' शेवटची 25 मिनिटं... महाराजांनी जे..."; 'छावा' पाहिल्यानंतर क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.