एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित!

बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान याने आज मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची 30 वर्ष पूर्ण केली आहेत. याच खास निमित्ताने आज त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळाले आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देत, त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.

Boyz 3 : 'बॉईज' परत येतायत... सोशल मीडियावर झळकतोय 'बॉईज 3'चा ट्रेलर

Boyz 3 : काही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'ने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज 2' मधून ते डबल धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला हे तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 

अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.

Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट

गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द, बुलढाण्यातील प्रेक्षकांची चित्रपटगृह चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार!

अभिनेते प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी मुख्य भूमिका साकारली असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसत आहे. याच विरोधात आवाज उठवत बुलढाण्यातील प्रेक्षकांनी चित्रपटगृह मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'Emergency' लवकरच होणार रिलीज; इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार पंगाक्वीन

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने आता तिच्या आगामी 'इमरजेंसी' सिनेमा संदर्भात एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कंगनाचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mukta Barve : काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय'; प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वेचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही रंगल्या होत्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

VP Khalid : शूटिंग दरम्यानच घेतला अखेरचा श्वास, प्रसिद्ध मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन

ज्येष्ठ टीव्ही अभिनेते व्हीपी खालिद यांचे शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. व्हीपी खालिद हे वक्कममध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरील बाथरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. व्हीपी खालिद हे टोविनो थॉमस यांच्या आगामी चित्रपटावर काम करत होते आणि शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Ranbir Kapoor : बल्लीचे पात्र साकारायला रणबीरला लागायचे तासनतास

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'शमशेरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच 'शमशेरा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील रणबीरच्या लूकने मात्र प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. रणबीरने या सिनेमात बल्लीचे पात्र साकारले आहे. हे पात्र साकारण्यासाठी रणबीरला खूप मेहनत करावी लागली आहे.

Sharad Ponkshe : ‘मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहीले!’, एकनाथ शिंदेंसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट

अभिनेता शरद पोंक्षे हे चित्रपट,  मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आपल्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. केवळ अभिनयच नाही तर, आपल्या बेधडक मतांसाठी देखील ते नेहमी चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सत्तेचं राजकारण ढवळून निघालं आहे. मात्र, या सगळ्यात आता अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget