TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या :
देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...बहुचर्चित 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित
बहुचर्चित अनन्या हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे अनन्या हे पात्र साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हृता दुर्गुळे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत.
शक्ती कपूर यांच्या मुलाची जामिनावर सुटका
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत हजर होता. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं. आता सिद्धांत आणि आणि इतर चार जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांना यापुढे जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांसमोर हजर राहावे लागेल' अशी माहिती डीसीपी पूर्व बेंगळुरू भीमा शंकर गुलेद यांनी दिली आहे.
सलमानला धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू: सूत्रांची माहिती
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज
ओटीटी विश्वात पंकज त्रिपाठीचे नाव महत्तवाचे मानले जाते. पंकजने अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पंकजच्या एक वेबसीरिजचा सीझन संपल्यानंतर दुसरा सीझन येईपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. आता पंकजच्या 'क्रिमिनल जस्टिस' या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपिका पादुकोणची सेटवर प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेने पार केला 700 भागांचा टप्पा; टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल
'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या मालिकेने 700 भागांचा टप्पा पार केला आहे. मागील तीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
'खतरों के खिलाडी'चे बारावे पर्व 2 जुलैपासून होणार सुरू
रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांना साहसी खेळ पाहायला मिळत आहेत. आता 'खतरों के खिलाडी' हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
'अंधेरे की रानी'; ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातील मौनी रॉयचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन आणि नागार्जुनच्या लूकनंतर आता अभिनेत्री मौनी रॉयचा लूक निर्मात्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
ह्रतिकची जाहिरात करण्याची अनोखी पद्धत; बर्गर किंग कंपनीला म्हणाला...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या नृत्यशैलीनं आणि हटके स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. ह्रतिक सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या बर्गर किंग या कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बर्गर किंग कंपनीच्या जाहिरात करण्याच्या पद्धतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.