Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा
Viju Mane : विजू मानेंची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viju Mane : 'पावनखिंड', 'झुंड' आणि 'द कश्मीर फाइल्स' हे सिनेमे सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असले तरी या तीन सिनेमांची प्रेक्षक तुलना करताना दिसत आहेत. दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. विविध विषयांवर ते त्यांची मतं मांडत असतात. 'पावनखिंड', 'झुंड' आणि 'द कश्मीर फाइल्स' सिनेमांची तुलना करत असलेल्या सिनेप्रेक्षकांवर दिग्दर्शक विजू मानेंनी निशाणा साधला आहे.
विजू मानेंनी लिहिले आहे,"कुठे चाललो आहोत आपण? 'पावनखिंड' विरुध्द 'झुंड' विरुध्द 'कश्मीर फाइल्स' ? ही कुठली विद्वेषाची लढाई लढता आहात? काय साध्य होणार आहे याने? मी स्वतःला उजवा डावा पुरोगामी वगैरे मानत नाही. मी माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देणारा आहे. एक सिनेमा बनतो त्यावर अमुक एका जातीचा शिक्का लावण्यापेक्षा सिनेमा म्हणून का पाहिलं जात नाही? सिनेमा म्हणून जर आवडला नाही तर तो प्रत्येकाच्या आवडी निवडीचा भाग आहे असं समजून त्यांच्या मताचा आदर का केला जात नाही?".
विजू मानेंनी नेटकऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले,"जातीचा आणि धर्माचा अभिमान असायलाच हवा, तो दुराभिमान आणि द्वेष बनला की त्याचं विष बनतं. अमुक एका जातीत किंवा धर्मात जन्माला आलोय यात माझं कर्तृत्व काय? आणि माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगताना इतर जाती धर्मांना तुच्छ् किंवा अन्यायकारी ठरवण्याचा अधिकार मला कोण देतं?"
विजू मानेंची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील विजू मानेंच्या पोस्टचे कौतुक करत आहेत. विजू मानेंनी सिने प्रेक्षकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
संबंधित बातम्या
Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर येतील शहारे!
Me Vasantrao : माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं! 'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित
38 krishna villa : ‘38 कृष्ण व्हिला’ लवकरच रंगभूमीवर; 'या' दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha