Tigmanshu Dhulia : 'द कश्मीर फाइल्स'टुकार; तिग्मांशु धुलियाने प्रोपगंडा सिनेमा बनवणाऱ्यांची घेतली शाळा
Tigmanshu Dhulia : 'गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेता-दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनी प्रोपगंडा सिनेमा बनवणाऱ्यांची शाळा घेतली आहे.
Tigmanshu Dhulia : देशात गेल्या काही दिवसांत 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files), 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) ते 'आर्टिकल 370' (Article 370) पर्यंतचे सिनेमे बनत आहेत. तर लवकरच 'बस्टर' आणि 'द साबरमती स्टोरी' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता 'गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेता आणि निर्माते तिग्मांशु धुलिया (Tigmanshu Dhulia) यांनी असे प्रोपगंडा सिनेमा बनवणाऱ्यांची शाळा घेतली आहे. तसेच हे सिनेमे टुकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'रेड माइक' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिग्मांशूने 'द कश्मीर फाईल्स' सारख्या सिनेमांवर भाष्य केलं आहे. कोणत्याही दिग्दर्शकाचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. त्यांच्याबद्दल बोलणंही टुकार असल्याचं ते म्हणाले आहेत. राज्य योजनांचं समर्थन करणाऱ्या सिनेमांबद्दल बोलताना तिग्मांशु म्हणाला,"त्या पद्धतीचे सिनेमे अत्यंत वाईट आहेत, कोण पाहतात ते चित्रपट? चालतदेखील नाहीत. फक्त कश्मीर फाईल्स चालला. या सिनेमांबद्दल मला बोलायचं नाही. टुकार सिनेमे आहेत हे सर्व".
हॉलिवूड दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्याबद्दल बोलताना तिग्मांशु म्हणाला,"स्टीवनसारखे दिग्दर्शक हॉलिवूडच्या नियमांप्रमाणे काम करतात. पण दिग्दर्शक म्हणून त्यांची काही ओळख नाही. तर दुसरीकडे स्कोर्सेसेची विचारधारा त्याच्या कलाकृतींमध्ये दिसून येते".
View this post on Instagram
तिग्मांशु धुलिया म्हणाला,"राजकारणांकडून प्रेरणा घेऊन सिनेमे बनवणारे अनेक दिग्दर्शक आहेत. सिनेमांवर तुम्ही विश्वास ठेवता. पण या सिनेमांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. राजकारण्यांचा विचार करुन हे सिनेमे बनवले जातात हे खूप वाईट आहे. भारतीत प्रोपगंडा सिनेमा चांगल्या पद्धतीने बनवले जात नाहीत. पैसे कमावणं हा फक्त त्यांचा उद्देश असतो".
'कश्मीर फाईल्स' अन् 'केरळ स्टोरी'ने जगभरात केली 300 कोटींची कमाई
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाने देशभरात 252.25 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 341 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. तर 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने देशभरात 241.74 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 302 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या