एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमानच्या 'टायगर जिंदा है'ची पहिल्या दिवशी बंपर कमाई
शुक्रवारी 'टायगर..' ला 5 हजार 700 स्क्रीन्स मिळाल्या असून त्यापैकी 4 हजार 600 स्क्रीन्स भारतात आहेत
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका घडवत असतात. सलमान-कतरिनाची भूमिका असलेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाला या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचं ओपनिंग मिळालं आहे. शुक्रवारी 'टायगर...' ने 33.75 कोटींची कमाई केली.
चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 'बाहुबली 2' नंतर 'टायगर जिंदा है' 2017 मधला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटींचा गल्ला जमवला होता.
https://twitter.com/taran_adarsh/status/944493937812631552
सलमानच्या 'टायगर जिंदा है'चे पोस्टर जाळले
'टायगर जिंदा है' हा सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. मात्र दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कबीर खान ऐवजी अली अब्बास जफरने खांद्यावर घेतली होती. सलमान आणि कतरिना यांनी जवळपास पाच वर्षांनी सिनेमात एकत्र भूमिका केली आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/944494075390017536 ट्युबलाईट नंतर प्रदर्शित झालेला सलमानचा हा पहिलाच सिनेमा आहे. ट्युबलाईट बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी बजावू शकला नव्हता.दोनशे-चारशे नाही! 'टायगर जिंदा है'चं तिकीट अडीच हजारावर
शुक्रवारी 'टायगर..' ला 5 हजार 700 स्क्रीन्स मिळाल्या असून त्यापैकी 4 हजार 600 स्क्रीन्स भारतात आहेत. देवा आणि गच्ची हे दोन मराठी चित्रपटही शुक्रवारी प्रदर्शित झाले होते. देवा आणि टायगर यांच्यातील स्क्रीनयुद्धानंतर मनसेने यशराज फिल्म्सला इशारा दिला होता. मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळाले. स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला.मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’ला राज्यभरात 225 स्क्रीन!
अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आणि मराठीतील ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे 'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे. यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे. 'देवा'च्या टीमला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी थेट मनसेचा रस्ता धरला.संबंधित बातम्या :
'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात
सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
मुंबई
लातूर
Advertisement