
Heropanti : हिरोपंतीसाठी टायगर आणि कृतीनं असं दिलं ऑडिशन ; साजिद नाडियाडवालानं सांगितला मजेशिर किस्सा
Heropanti : साजिद यांनी हिरोपंती या चित्रपटाच्या ऑडिशनचा मजेशिर किस्सा प्रेक्षकांना सांगितला.

Heropanti : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांनी हिरोपंती (Heropanti) चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मीती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी केली होती. नुकतीच हिरोपंती चित्रपटाच्या टीमनं 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा साजिद यांनी या चित्रपटाच्या ऑडिशनचा मजेशिर किस्सा प्रेक्षकांना सांगितला.
हिरोपंती चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या टायगरनं साजिद यांना सांगितले होते की, 'जर त्याचं अक्षिनय क्षेत्रात करिअर झालं नाही तर तो अमेरिकेला जाईल.' जेव्हा साजिद यांच्याकडे हिरोपंती चित्रपटाची स्क्रिप्ट आली, तेव्हा त्यांनी या चित्रपटाची ऑफर टायगर श्रॉफला दिली. साजिद यांनी टायगरला तेव्हा प्रश्न विचारला की, 'जर तुझं या क्षेत्रात करिअर झालं नाही तर तु काय करशील?' तेव्हा तो म्हणाला की,'मी या क्षेत्रात चांगलं काम करेल पण माझं करिअर नाही झालं तरी मी इथेच राहणार आहे.' टायगरचे हे उत्तर ऐकल्यानंतर साजिदनं या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी टायगरची निवड केली.
View this post on Instagram
ऑडिशनच्या दिवशीच कृतीनं साइन केला चित्रपट
कृतीनं जेव्हा या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं त्याचं दिवशी तिनं हा चित्रपट साइन केला. ऑडिशनसाठी तेव्हा दोन मुली आल्या होत्या. पण त्या दोघींनाही चित्रपट निर्मात्यांनी रिजेक्ट केलं आणि क्रितीची निवड केली होती.
महत्वाच्या बातम्या
Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
