Sachin Padalkar on Beed : 400 अंमलदार, SP, RCP ते SRPF; बीड मोर्चाला पोलिसांची टाईट सुरक्षा
Sachin Padalkar on Beed : 400 अंमलदार, SP, RCP ते SRPF; बीड मोर्चाला पोलिसांची टाईट सुरक्षा
बीडमधील शस्त्राचे (Beed Crime) क्रूर प्रदर्शन पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मोठा निर्णय घेतलाय. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्याकडे असलेली बंदूक ते शासनाकडे परत करणार आहेत. बीडमधील (Beed Crime) शस्त्राचे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकाश महाजन यांनी आपल्याकडील बंदूक शासनाला परत करण्यातचा निर्णय घेतलाय. निवडणूक काळात शासनाकडे जमा केलेली बंदूक आता मी घेणार नाही. उलट पोलिसांना ती जमा करणार असल्याचा निर्णय प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे.
गन कल्चरमुळे बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण - अंजली दमानिया
बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पिस्तूलचे प्रदर्शन केले जाते. त्यामुळे समाजामध्ये दहशत निर्माण होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तेच बघितल्यानंतर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्याकडील परवानाधारक बंदूकही शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे..
श्वापदापासून संरक्षण व्हावे म्हणून बंदुक घेतली होती, प्रकाश महाजन काय काय म्हणाले?
खरंतर शेतामध्ये राहत असताना श्वापदापासून संरक्षण व्हावे म्हणून ही बंदूक मी घेतली होती. आता माझं वय 72 वर्ष आहे, त्याचा मला तसाही काही उपयोग राहिला नाही. म्हणून ही बंदूक मी आता शासनाकडे जमा करणार आहे, असंही त्यावेळी प्रकाश महाजन म्हणाले आहेत.