Tiger 3 Worldwide Collection : 'टायगर 3'चा जगभरात बोलबाला; 300 कोटींच्या क्लबमध्ये सलमानच्या सिनेमाची एन्ट्री
Tiger 3 : 'टायगर 3' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला आहे. 300 कोटींच्या क्लबमध्ये आता या सिनेमाची एन्ट्री झाली आहे.
जगभरात 'टायगर 3'चा बोलबाला
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' या सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला असून भारतात या सिनेमाने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Tiger 3 Box Office Collection)
'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'टायगर 3' या सिनेमाने 44.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.44 कोटी, सातव्या दिवशी 3.9 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या सात दिवसांत 'टायगर 3' या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 204.18 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
पहिला दिवस : 44.5 कोटी
दुसरा दिवस : 59.25 कोटी
तिसरा दिवस : 44.3 कोटी
चौथा दिवस : 21.1 कोटी
पाचवा दिवस : 18.5 कोटी
सहावा दिवस : 13.44 कोटी
सातवा दिवस : 3.9 कोटी
एकूण कमाई : 204.18 कोटी
'टायगर 3' ओटीटीवर होणार रिलीज! (Tiger 3 OTT Release)
सलमान खानचा 'टायगर 3' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'टायगर 3' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'टायगर 3' हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
'टायगर 3' या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचीदेखील (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळत आहे. आता भाईजानचा 'टायगर 3' किंग खानच्या 'पठाण' आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सलमानच्या चाहत्यांमध्ये 'टायगर 3' या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाशमी, रेवती, रणवीर शौरी, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सलमानचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.
संबंधित बातम्या