Salman Khan : 'Tiger 3'नंतर सलमानचा 'द बुल' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
Salman Khan Next Movie : 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमानंतर सलमान खान आता 'द बुल' (The Bull) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. तर दुसरीकडे भाईजानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे 'टायगर 3' धमाका करत असताना सलमानने त्याच्या आगामी सिनेमाचं नाव जाहीर केलं आहे. भाईजानच्या आगामी सिनेमाचं नाव 'द बुल' (The Bull) असं आहे.
करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या (Dharma Production) बॅनरअंतर्गत सलमान खान काम करणार असल्याची चर्चा होती. तर विष्णु वर्धन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता सलमानने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सलमानने आगामी प्रोजेक्टचा केला खुलासा
सलमानने 'जूम'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आगामी सिनेमांबद्दल भाष्य केलं आहे. सलमान खान म्हणाला,"मी सध्या 'द बुल' या सिनेमावर काम करत आहे. या सिनेमानंतर 'दबंग'च्या आगामी भागाचं काम सुरू करेल. किकचा सीक्वेल आणि सूरड बडजात्याच्या आगामी 'प्रेम की शादी'सह तीन-चार सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील".
करण जोहरच्या 'द बुल' या सिनेमात सलमान खान पैरामिलिट्री ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमान आणि करण जोहर तब्बल 25 वर्षांनी एकत्र काम करतील. सलमानने करणच्या 1998 मध्ये आलेल्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात काम केलं होतं.
सलमानच्या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता
सलमानच्या आगामी सिनेमांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लाडक्या भाईजानच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 258 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 413.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. 500 कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे.
सलमानच्या 'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Tiger 3 Box Office Collection)
सलमान खानचा बहुचर्चित 'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 5925 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, सातव्या दिवशी 18.5 कोटी, आठव्या दिवशी 10.5 कोटी, नवव्या दिवशी 7.35 कोटी, दहाव्या दिवशी 6.7 कोटी, अकराव्या दिवशी 5.8 कोटी, बाराव्या दिवशी 5.12 कोटी आणि तेराव्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या