एक्स्प्लोर

Tiger 3 OTT : सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

Tiger 3 : सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'टायगर 3' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Salman Khan Tiger 3 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 'टायगर 3' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. दिवाळी असूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'टायगर 3'

सलमान खानचा 'टायगर 3' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'टायगर 3' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'टायगर 3' हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. 

'टायगर 3' या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचीदेखील (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळत आहे. आता भाईजानचा 'टायगर 3' किंग खानच्या 'पठाण' आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'टायगर 3' या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तिने जोयाची भूमिका साकारली होती. तसेच इमरान हाशमीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

सलमानला मोठा फटका; 'टायगर 3' ऑनलाईन लीक

सलमान खानचा 'टायगर 3' हा बहुचर्चित सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. एचडी क्वालिटीमध्ये हा सिनेमा वेगवेगळ्या साइट्स आणि टेलीग्रामवर लीक झाला आहे. 'टायगर 3' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर झाला आहे. 

सलमानच्या चाहत्यांमध्ये 'टायगर 3' या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाशमी, रेवती, रणवीर शौरी, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सलमानचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Tiger 3 : सलमानच्या 'टायगर'चा दिवाळी धमाका; मध्यरात्री शो, ब्लॅकमध्ये तिकीटांची विक्री, चाहत्यांचा जल्लोष; 'टायगर 3'ने दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Mouni Roy Divorce Rumors: मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget