एक्स्प्लोर
मिका सिंहच्या बचावासाठी एक्स गर्लफ्रेंड राखी सावंत मैदानात
मुंबई: एकेकाळी बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतने गायक मीका सिंहवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. पण जेव्हा मीकावर पुन्हा छेडछेडचा आरोप होत आहे, तेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड राखी सावंत वाचवण्यासाठी धावून आली आहे.
राखीने मीकाच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला असून, तिने मीकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रही देऊ केले आहे. ती प्रतिक्रीया देताना म्हणाली की, ''मीका माझा चांगला मित्र असून, त्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदा अश्रू पाहिले आहेत. आज तुम्ही मला मीकाची वकील किंवा मैत्रिण समजलात तरी चालेल, पण यावेळी मीका निर्दोष आहे. त्याने असे कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, ज्यामुळे त्याला तुरूंगात जावे लागेल.''
मुंबईतील एका डिझायनरने मीकावर गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री २ वाजता ती मीका सिंगच्या मुंबईतील जुहूमधील घरी होती. या दोघांमध्ये पैशांवरून जोरदार वाद झाले. यावेळी मीकाने तिला धक्का देऊन गैरवर्तन केले.
पण, दुसरीकडे मीकाचे म्हणणे आहे की, डिझायनरने त्याच्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मीका आणि डिझायनरची पाच वर्षांपासून परिचय आहे.
मुंबई पोलिसांनी मीका सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. यासाठी मीकाला चौकशीसाठी एक-दोन दिवसांत बोलवले जाऊ शकते. पोलिसांनी तपासासाठी बिल्डिंगचे सीसीटिव्ही फुटेजही मागवले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement