Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन; वयाच्या 66 व्या घेतला अखेरचा श्वास
Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचे निधन झाले आहे.
Aamir Raza Husain Passed Away : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
आमिर रजा हुसैन यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Aamir Raza Husain)
आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain Passed Away) यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. अजमेरमध्ये शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली.
RIP @AamirRazaHusain 🌺🌺 pic.twitter.com/xJFzTwKgVA
— Rohit Bansal 🇮🇳 (@theRohitBansal) June 3, 2023
'आदिपुरुष'मध्ये झळकणार आमिर राज
आमिर राज यांनी 'बाहुबली' 'आरआरआर' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. तसेच येत्या 16 जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'आदिपुरुष' सिनेमातदेखील त्यांची झलक पाहायला मिळणार आहे. 1984 रोजी त्यांचा 'किम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच 2014 साली 'खुबसूरत' या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. या रोमॅंटिक सिनेमात ते सोनम कपूर आणि फवादसोबत झळकले होते.
'कारगिल' आणि 'लीजेंड्स ऑफ राम' या लोकप्रिय नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा आमिर राज यांनी सांभाळली आहे. कॉलेजमध्ये असताना आमिर यांनी जॉय मायकल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च सारख्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.
आमिर रझा हुसैन होते भाजपचे सदस्य
आमिर रझा हुसैन हे एकेकाळी भाजपचे (BJP) सदस्य होते. त्यांनी दिल्लीत भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर जुलै 2013 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.
रंगभूमीवर सक्रिय असणारे आमिर रझा हुसैन
आमिर रझा हुसैन यांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. आमिर रझा हुसैन 1993 साली अभिनेत्री विराट तलवारसोबत लग्नबंधनात अडकले. आमिर रझा हुसैन आणि विराट यांना सुकैना आणि गुलाम अली अब्बास ही दोन मुलं आहेत. आमिर रझा हुसैन हे रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते होते. अनेक गाजलेल्या नाटकांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
संबंधित बातम्या