एक्स्प्लोर
हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषला धोनीही वाचवू शकला नाही !
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बायोपिक 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमाईमध्ये या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.
या सिनेमात कॅप्टन कूल धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूतने साकारली आहे. धोनीच्या खास हेलिकॉप्टर शॉटचं रहस्य या सिनेमातून उलगडलं आहे. हेलिकॉप्टर शॉटचा निर्माता हा धोनी नव्हे तर त्याचा खास मित्र संतोष लाल असल्याचं, या बायोपिकमधून समोर आलं. संतोषनेच धोनीला हा शॉट शिकवला. मात्र ज्या संतोषने धोनीला हा शॉट शिकवला, त्याची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. संतोष लालचा 32 व्या वर्षीच दुर्दैवी मृत्यू झाला.
थप्पड शॉट बनला हेलिकॉप्टर शॉट
संतोष आणि धोनी हे लहानपणीचे मित्र. दोघेही एकत्र खेळत होते. संतोष हेलिकॉप्टर शॉट मारण्यात पटाईत होता. या शॉटला संतोष थप्पड शॉट म्हणत होता. तोच शॉट शिकण्यासाठी धोनीही आतूर होता. धोनीने संतोषला हा शॉट शिकवण्याची विनंती केली. संतोषने ही विनंती मान्य करत धोनीला थप्पड शॉट शिकवला, धोनीने पुढे तो हेलिकॉप्टर शॉट म्हणून जगासमोर आणला. काही समोस्यांच्या बदल्यात संतोषने धोनीला हा शॉट शिकवला होता, हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर शॉट निर्मात्याचा 32 व्या वर्षी मृत्यू
धोनीला ज्याने हेलिकॉप्टर शॉट शिकवला, त्या संतोष लालचा ऐन तारुण्यात मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वीच वयाच्या 32 व्या वर्षी संतोषचा स्वादूपिंडाच्या विकाराने मृत्यू झाला.
टीम इंडियात निवड झाल्यानंतर धोनी आणि संतोषच्या भेटीगाठी होत नव्हत्या, मात्र तरीही धोनी संतोषच्या संपर्कात होता. धोनी आणि संतोष हे टेनिस बॉलने खेळत होते. दोघेही झारखंड रणजी संघाकडून खेळत होते. मात्र एकीकडे धोनीचं करिअर बहरत होतं, तर दुसरीकडे हेलिकॉप्टर शॉटच्या निर्मात्याची प्रकृती ढासळत होती. जुलै 2013 मध्ये संतोषचं स्वादूपिंडाच्या विकाराने निधन जालं.
हेलिकॉप्टर शॉटच्या निर्मात्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा
संतोष शेवटच्या घटका मोजत होता, मात्र धोनी त्याला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होता. संतोषला स्वादूपिंडाच्या विकाराचं निदान झालं, तेव्हा त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज होती. धोनी त्यावेळी भारतीय संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर होता. संतोषची प्रकृती खालावल्याचं समजताच, धोनीने तातडीने त्याच्यासाठी खास एअर अम्ब्युलन्सची सोय केली. संतोषला उपचारासाठी तातडीने रांचीवरुन दिल्लीकडे हलवण्यात आलं. मात्र नियतीला संतोषच्या प्रकृतीत सुधारणा मान्य नव्हती. कारण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दिल्लीला न पोहोचता ते वाराणसीत उतरवावं लागलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement