एक्स्प्लोर

The Vaccine War: 'द कश्मीर फाइल्स' नंतर आता विवेक अग्निहोत्री यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; द वॅक्सीन वॉर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

आता द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘द वॅक्सीन वॉर’(The Vaccine War) असं या चित्रपटाचं नाव आहे.

The Vaccine War:  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘द वॅक्सीन वॉर’(The Vaccine War) असं या चित्रपटाचं नाव आहे. ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली. 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचं पोस्टर दिसत आहे. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिलं, 'सादर करत आहोत- ‘द वॅक्सीन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.'

अनेक नेटकऱ्यांनी द वॉक्सीन वॉर या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'हा एक सुपर डुपर हिट चित्रपट असेल. मी माझ्या मित्रांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शो बघेन.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.

'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

The Kashmir Files 2 : 'द काश्मीर फाइल्स 2' पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला; विवेक अग्निहोत्रीची माहिती

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget