एक्स्प्लोर

The Archies: मैत्री, प्रेम, रोमान्स आणि मतभेद; 'द आर्चीज' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; शाहरुखच्या लेकीच्या अभिनयानं वेधलं लक्ष!

The Archies Trailer Out: आर्चीज या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सुहाना खानच्या (Suhana Khan) अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

The Archies Trailer Out:  द आर्चीज (The Archies) या  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये काही मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तरुणपणात मित्रांमध्ये होणारे मतभेद तसेच रोमान्सचा तडका  द आर्चीज या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  द आर्चीज या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सुहाना खानच्या (Suhana Khan) अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'द आर्चीज'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला सुहाना खान ही वेरोनिका या भूमिकेत दिसत आहेत. वेरोनिकाच्या वडिलांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्रीन पार्कवर एक भव्य हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला. वेरोनिकाच्या वडीलांच्या या निर्णयामुळे वेरोनिकामध्ये आणि तिच्या सर्व मित्र-मैत्रिणी मतभेद निर्माण होतात, असं ट्रेलरमध्ये दिसते.

चित्रपटाच्या ट्रेलरवरुन चित्रपटाच्या कथानकाबद्दल माहिती मिळते की हा चित्रपट 1950 आणि 1960 च्या दशकातील कथेवर आधारित असणार आहे. आता झोया अख्तरने अखेर 'द आर्चीज' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये डान्स, मैत्री, रोमान्स आणि सर्व इमोशन्स दिसत आहेत.

पाहा ट्रेलर:

View this post on Instagram
 
A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

फ्रिडम, मैत्री,  प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे.  

'द आर्चीज' या चित्रपटामधून  अनेक स्टार किड्स डेब्यू करत आहेत. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच 'द आर्चीज'च्या इतर स्टार्समध्ये मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांचा समावेश आहे.

‘द आर्चिज’ कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

‘द आर्चिज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. हा चित्रपट 'द आर्चीज' या कॉमिक बुकवर आधारित आहे. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

The Archies Release Date: शाहरुख खानच्या लेकीचा द आर्चीज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Embed widget