एक्स्प्लोर

Telly Masala : शाहरुख खानला धमकी ते बिग बॉस 18 चा होस्ट बदलला; जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

'या' चित्रपटाचे बनलेत 8 रिमेक, सगळेच्या सगळे ब्लॉकबस्टर; 2024 मध्ये रिलीज झालेल्या फिल्मनं तर कमावलेत 100 कोटी

8 Remakes of This Film Have Been Made All Were Blockbusters: एखादा चित्रपट हिट होतो न होतो, तोच त्याचा रिमेक करण्यासाठी मेकर्सच्या उड्या पडतात. ती फिल्म बॉलिवूडची बेस्ट फिल्म करण्यासाठी मग वाट्टेल त्याचा आधार घेण्यासाठी तयार असतात. मग तगडी स्टारकास्ट आणली जाते, महागड्या लोकेशन्सवर शूट केलं जातं... एका नाहीतर अनेक गोष्टी केल्या जातात. सध्या असाच एक चित्रपट बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा फॉर्म्युला एकदा, दोनदा नाहीतर तब्बल आठ वेळा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. तेही एका भाषेत नाहीतर, वेगवेगळ्या भाषांमध्ये हा फॉर्म्युला सक्सेसफुल्ल ठरला आहे. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा... 

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 चा होस्ट बदलला! सलमान खानऐवजी कोणता सेलिब्रिटी सांभाळणार शोची धुरा?

Bigg Boss 18 Host Change : बिग बॉस 18 हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो असून याचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोसंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आता बिग बॉस शो सलमान खान होस्ट करणार नाही. बिग बॉस 18 शोचा होस्ट तडकाफडकी बदलण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता बिग बॉस 18 वीकेंड का वारच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खानऐवजी दुसऱ्या सेलिब्रिटीवर देण्यात येणार आहे. शोचा निर्मात्यांनी शोचा होस्ट बदलण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा... 

मोठी बातमी! सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

Shah Rukh Khan Death Threats : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकी प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी धमकीचा फोन आला होता, यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला असून पुढील तपास सुरु आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Video:अशोक मामांकडून खाल्ला ओरडा, उलटं उत्तर देत उभारली, कलर्सवर येणाऱ्या नव्या मालिकेची झलक पाहिली का?

Ashok Ma Ma: मराठी मनोरंजनसृष्टीत सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ आता मालिकेतून दमदार कमबॅक करत आहेत.  पण नेहमीसारखी वल्ली भूमिका न करता यावेळी ते अत्यंत शिस्तप्रीय काटेकोर वागणाऱ्या वडिलांच्या भूमिकेत दिसतायत. कलर्स मराठीवर आता एका नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव ' अशोक मा. मा. असं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 चा होस्ट बदलला! सलमान खानऐवजी कोणता सेलिब्रिटी सांभाळणार शोची धुरा?

Bigg Boss 18 Host Change : बिग बॉस 18 हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो असून याचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोसंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आता बिग बॉस शो सलमान खान होस्ट करणार नाही. बिग बॉस 18 शोचा होस्ट तडकाफडकी बदलण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता बिग बॉस 18 वीकेंड का वारच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खानऐवजी दुसऱ्या सेलिब्रिटीवर देण्यात येणार आहे. शोचा निर्मात्यांनी शोचा होस्ट बदलण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Priya Bapat : लग्नानंतर 13 वर्षानंतरही मुलं नाही, बाळ होण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री प्रिया बापट स्पष्टच म्हणाली...

Priya Bapat On Pregnancy : अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतीलही एक मोठा चेहरा आहे. अभिनेत्री प्रिया बापट हिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती उमेश कामत ही इंडस्ट्रीमधील एक लाडकी जोडी आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. ही जोडी नेहमीच नवनवीन कपल्स गोल सेट करत असते. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत, यानंतर ही त्यांचं नातं नवविवाहित जोडप्याप्रमाणे फारच गोड आहे. लग्नाला इतकी वर्ष होऊनही मुल नसल्याच्या प्रश्वावर प्रिया बापटने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मृत्यूपूर्वी खूप दुःखी होती दिव्या भारती, गोविंदासोबत केलेली पार्टी; को-स्टारचा खळबळजनक खुलासा

Guddi Maruthi Reveals Divya Bharti Accident: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti), आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. 1990 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती, दिव्या भारती. दिव्या भारतीनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली होती. आजपर्यंत बॉलिवूडची (Bollywood) एकही अभिनेत्री दिव्या भारतीची जागा घेऊ शकलेली नाही. दिव्या भारतीनं 1993 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण देशासह बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. 5 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडून दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याच्या जाण्याला काहींनी आत्महत्या म्हटलं, तर काहींनी हत्या. पण अद्याप नेमकं काय घडलं? हे समोर आलं नव्हतं. काहींनी याला आत्महत्या म्हटलं तर काहींनी हत्या म्हटलं. दिव्याच्या मृत्यूचा आरोप दिव्या भारतीचा पती साजिद नाडियाडवालावर होता. त्या दिवशी नेमकं काय झालं? ते आजतागायत कळू शकलेलं नाही. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्या दिवसाचं सत्य समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने दिली गूड न्यूज, लग्नाच्या 9 वर्षांनंतर होणार आई

Monika Dabade Pregnancy Announcement  : 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्याशीही प्रेक्षक जोडले गेले आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या रिअल लाईफमधील अपडेट्स शेअर करत असतात. आता या मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget