मृत्यूपूर्वी खूप दुःखी होती दिव्या भारती, गोविंदासोबत केलेली पार्टी; को-स्टारचा खळबळजनक खुलासा
Divya Bharti Death: दिव्या भारतीचा मृत्यू कसा झाला? याचं सत्य तब्बल 21 वर्षांनंतर समोर आलं आहे. गुड्डी मारुतीनं सांगितलं की, दिव्याचा पती साजिद नाडियादवाला याचा यात काहीही हात नाही. दिव्याचा मृत्यू अपघाती होता.
Guddi Maruthi Reveals Divya Bharti Accident: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti), आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. 1990 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती, दिव्या भारती. दिव्या भारतीनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली होती. आजपर्यंत बॉलिवूडची (Bollywood) एकही अभिनेत्री दिव्या भारतीची जागा घेऊ शकलेली नाही. दिव्या भारतीनं 1993 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण देशासह बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. 5 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडून दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याच्या जाण्याला काहींनी आत्महत्या म्हटलं, तर काहींनी हत्या. पण अद्याप नेमकं काय घडलं? हे समोर आलं नव्हतं. काहींनी याला आत्महत्या म्हटलं तर काहींनी हत्या म्हटलं. दिव्याच्या मृत्यूचा आरोप दिव्या भारतीचा पती साजिद नाडियाडवालावर होता. त्या दिवशी नेमकं काय झालं? ते आजतागायत कळू शकलेलं नाही. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्या दिवसाचं सत्य समोर आलं आहे.
दिव्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?
नव्वदच्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीच्या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला होता. 5 एप्रिल 1993 रोजी फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. शोला आणि शबनम या चित्रपटांमध्ये दिव्यासोबत काम केलेली अभिनेत्री गुड्डी मारुती यांनी आता दिव्या भारतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिव्या खूपच उत्साही आणि हळवी होती. त्यासोबतच गुड्डी मारुती यांनी दिव्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? याबाबत सांगितलं आहे. दिव्याच्या मृत्यूच्या घटनेची आठवण करुन देत, गुड्डी मारुतीनं सांगितलं की, त्या रात्री दिव्या अभिनेता गोविंदा, साजिद आणि इतरांसोबत पार्टी करत होती. तसं पाहायला गेलं तर, ती मजा करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र दुखः होतं. दुसऱ्या दिवशी दिव्याचं शुटिंग होतं, तिला आऊटडोअर शूट होतं, पण तिला जायचं नव्हतं. त्यावेळी ती साजिद नाडियादवालाला डेट करत होती. हा तो काळ होता जेव्हा आम्ही शोला और शबनमचे शूटिंग करत होतो. माझा वाढदिवस 4 एप्रिल रोजी येतो. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र पार्टी करत होतो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा अपघात झाला.
गुड्डी मारुती पुढे बोलताना म्हणाली की, जेव्हा मी आईस्क्रिम घ्यायला जात होते, तेव्हा मला दिव्यानं वरच्या मजल्यावरुन मला हाक मारली. मी वर पाहिलं, तर ती तिच्या पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसली होती. तिचे पाय बाहेरच्या बाजूला होते. तिनं माझ्याकडे बोट दाखवलं. मी तिला पाहून घाबरले. मी सांगितलं की, हे सुरक्षित नाही. आत जा. ती म्हणाली, काही होत नाही. दिव्याला उंचीची भिती कधीच वाटत नव्हती.
गुड्डी मारुतीच्या म्हणण्यानुसार, दिव्याचा मृत्यू झाला तेव्हा साजिदची कार आली की नाही, हे पाहण्यासाठी ती बाल्कनीतून खाली पाहण्यासाठी थोडीशी वाकली. पण तिचा तोल गेला आणि ती पाचव्या मजल्यावरुन खाली पडली. दिव्याच्या मृत्यूनं तिची आई पुरती हादरुन गेली होती. साजिदला तर धक्का बसला होता. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी तो घरी नव्हता. दिव्याचा मृत्यू झाला, तेव्हा डिझायनर नीता लुल्ला तिच्या घरी उपस्थित होत्या, त्यांच्या म्हणण्यानुसार, बाल्कनीतून पडल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :