एक्स्प्लोर

Priya Bapat : लग्नानंतर 13 वर्षानंतरही मुलं नाही, बाळ होण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री प्रिया बापट स्पष्टच म्हणाली...

Priya Bapat On Pregnancy : अभिनेत्री प्रिया बापट हिने बाळ होण्याच्या प्रश्नावर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. उमेश कामथसोबतच्या नात्यावर प्रिया बापट नेमकं काय म्हणाली, जाणून घ्या.

Priya Bapat On Pregnancy : अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतीलही एक मोठा चेहरा आहे. अभिनेत्री प्रिया बापट हिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती उमेश कामत ही इंडस्ट्रीमधील एक लाडकी जोडी आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. ही जोडी नेहमीच नवनवीन कपल्स गोल सेट करत असते. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत, यानंतर ही त्यांचं नातं नवविवाहित जोडप्याप्रमाणे फारच गोड आहे. लग्नाला इतकी वर्ष होऊनही मुल नसल्याच्या प्रश्वावर प्रिया बापटने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटचं स्पष्ट वक्तव्य

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे आदर्श कपल नेहमी एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. अलिकडेच एका मुलाखतीत प्रियाने उमेशसोबतच्या नात्याबाबत आणि मुल होण्यावर भाष्य केलं आहे. लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतरही मुल का नाही, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो, घरच्या मंडळीपेक्षा बाहेरचे लोक हा प्रश्न जास्त विचारतात, असं यावेळी प्रिया बापटने म्हटलं आहे. लग्नाच्या 13 वर्षानंतरही मूल नसण्यावर अभिनेत्री प्रिया बापटने  स्पष्ट मत मांडलं आहे. 

लग्नानंतर 13 वर्षानंतरही अभिनेत्रीला मुलं नाही

अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि उमेशच्या रिलेशिनशिपबद्दल वक्तव्य केलं आहे. यावेळी प्रिया बापट म्हणाली की, "मला आता सतत बाळ होण्याच्या प्रश्वावर आता थकायला झालंय. लोकांचं प्रेम, लोकांची अपेक्षा काही असोत, पण मला घरच्यांनी याबद्दल विचारलं नाहीय, इतके वेळा बाहेरची मंडळी हा प्रश्न विचारतात. नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या एका काकूंनी मला प्रश्न विचारला होता की, गूड न्यूज कधी देताय?" 

उमेशसोबतच्या नात्यावर काय म्हणाली प्रिया?

प्रिया पुढे म्हणाली की, "मला सुरुवातीला बाळसंबंधित प्रश्नांचा राग यायचा. हा सर्वस्वी माझा, माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही विचारणारे कोण? असं मला वाटायचं. पण, नंतर मला हळूहळू कळालं की, हे लोकांचं माझ्या आणि उमेशबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा आहे, म्हणून लोक वारंवार हा प्रश्न विचारत असावेत". प्रियाने यावेळी सांगितलं की, "मूल जन्माला घालण्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न करत नाहीय, तर मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय म्हणून लग्न करतोय, मुलाचं जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू असं उमेश म्हणाला होता".

बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापट स्पष्टच म्हणाली...

"मला वाटतं लग्न आणि मूल हा दबाव प्रत्येक स्त्रीवरुन आपण दूर करायला हवा. माझ्या लग्नाला 13 वर्षा झाली आणि मूल नाही. पण, हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. उद्या मला वयाच्या 42 व्या वर्षी मूल जन्माला घालायची इच्छा असेल, तर मी घालेन आणि तेव्हा मला नाही वाटलं, तर नाही घालणार. पण, हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे, असं मला वाटतं. एका जोडप्याने मूल जन्माला घालायलाच हवं, असा अलिखित नियम आहे, तोच मला पटत नाही", असंही प्रियाने सांगितलं.

View this post on Instagram
 
A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Nitesh Rane on Disha Salian Aaditya Thackeray : सत्यमेव जयते! तुम्ही खोटं लपवू शकत नाही : नितेश राणेZero Hour Disha Salian : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
Embed widget