Video:अशोक मामांकडून खाल्ला ओरडा, उलटं उत्तर देत उभारली, कलर्सवर येणाऱ्या नव्या मालिकेची झलक पाहिली का?
कलर्स मराठीवर आता एका नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव ' अशोक मा. मा. असं आहे.
Ashok Ma Ma: मराठी मनोरंजनसृष्टीत सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ आता मालिकेतून दमदार कमबॅक करत आहेत. पण नेहमीसारखी वल्ली भूमिका न करता यावेळी ते अत्यंत शिस्तप्रीय काटेकोर वागणाऱ्या वडिलांच्या भूमिकेत दिसतायत. कलर्स मराठीवर आता एका नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव ' अशोक मा. मा. असं आहे.
या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे 'कलर्स मराठी'च्याच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील 'अशोक मा.मा' या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
कधी पाहता येणार ही मालिका?
कलर्स मराठीने नुकताच एका नव्या गोष्टीचा प्रेामो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ एका नव्या अंदाजात दिसत आहेत. 'अशोक मा. मा' ही त्यांची नवी मालिका आता २५ नोव्हेंबरपासून कलर्स मराठीवर रात्री 8.30 वाजता पाहता येणार आहे.
पिरतीचा वणवा..मधली सावीही अशोकमामांसोबत
कलर्स मराठीवर येणाऱ्या पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत घराघरात पोहोचलेली सावी म्हणजेच अभिनेत्री रसिका वाखारकर ही अशोक मामांच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेची पहिली झलक आल्यानंतर रसिकाच्या नव्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झाल्याचं तिनं सांगितलं.
काय म्हणाली रसिका वाखारकर?
"पिरतीचा वनवा उरी पेटला' ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. पण आता 'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी मामादेखील खूप आग्रही होते. मामांसोबत कॅमेरा शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते. मामा समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. सेटवर त्यांनी अगदी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. मामांसोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे हीच माझ्यासाठी खूप भारी गोष्ट आहे".