एक्स्प्लोर

Telly Masala : पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली ते अमिताभ-अभिषेकची 10 फ्लॅट विकत घेत मोठी गुंतवणूक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Pushpa 2 Release Date : पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली, 6 डिसेंबर नाही या दिवशी रिलीज होणार अल्लू अर्जूनचा चित्रपट

Pushpa 2 Release Date : सुपरस्टार अल्लू अर्जूनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2 चा टीझर समोर आला आहे. पुष्पा 2 : द रुल चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतही मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2021 मध्ये आलेल्या पुष्पा : द राईज चित्रपटाने धमाका केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासूनच प्रेक्षक पुष्पा चित्रपटाच्या सीक्वेलकडे डोळे लावून बसले आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून नवीन रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट प्री-पोन करण्यात आला आहे, म्हणजे चित्रपट आधी प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बच्चन कुटुंबात आलबेल नसल्याच्या बातम्या, इकडे अमिताभ-अभिषेकची 10 फ्लॅट विकत घेत मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून बसेल धक्का

Amitabh Bachchan Abhishek Bachchan 10 Apartments : बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील चर्चित कुटुंबापैकी एक आहे. गेल्या काही काळापासून या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चादेखील मागील बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहेत. एकीकडे बच्चन कुटुंबातील नात्यांमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे बच्चन कुटुंबाने मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी एक किंवा दोन नाही, तर 10 फ्लॅट विकत घेतले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मलायका अरोराच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाला, "कधी विसरु नकोस तू..."

Arjun Kapoor Criptic Post : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. एकेकाळी सोशल मीडियावर एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करणारे अर्जून-मलायका आता एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही दिसत नाहीत. अलिकडेच 23 ऑक्टोबरला मलायका अरोराचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जून कपूरने तिला शुभेच्छा देणारी पोस्ट केली नाही. मात्र, त्याऐवजी त्याने क्रिप्टीक पोस्ट केली. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याआधी अर्जून कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीही मलायकाने पोस्ट केली नव्हती, त्याच्या बर्थडे पार्टीमध्येही ती दिसली नाही. यामुळे या दोघांचं नातं आता संपलं असल्याचं बोललं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

TRP List : टीआरपी लिस्टमध्ये 'बिग बॉस 18' टॉप 5 च्या बाहेर, अनुपमा 'नंबर 1'; दुसऱ्या क्रमांकावर 'या' शोची बाजी

TRP List This Week : छोट्या पडद्यावर विविध मालिका सुरु आहेत. काहींना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे, तर काही मालिकांना खास प्रेक्षकवर्ग मिळवता आलेला नाही. टीव्ही मालिकांचं या आठवड्याच रँकिंग समोर आलं आहे. टीआरपी लिस्टमध्ये कोणत्या मालिकांचा समावेश आहे, टॉप 5 मालिकांमध्ये कोणत्या टीव्ही शोने स्थान मिळवलं आहे आणि कोणत्या शोला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे, हे स्पष्ट होतं.  यामध्ये अनुपमा मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मनोरंजनाचा 'बॉस' समजला जाणारा बिग बॉस शो मात्र टॉप 5 लिस्टच्या बाहेर आहे. सलमान खानच्या शोला टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Amitabh Bachchan Cryptic Post : "चले भैया"; अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बींची क्रिप्टीक पोस्ट चर्चेत, चाहत्यांची चिंता वाढली

Amitabh Bachchan Post : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. बिग बी चाहत्यांसोबत त्यांच्या भावना, किस्से आणि जीवनातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. एकीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे बिग बींसह बच्चन कुटुंबावर सर्वांच्या नजरा आहे. अशात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली क्रिप्टिक पोस्ट सर्वांच्या नजरेत आली आहे. बिग बींच्या या पोस्टचा नेटकरी वेगवेगळा अर्थ लावत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : चाहतबद्दल अविनाशचं अश्लील वक्तव्य, सिद्धार्थ शुक्लाचा VIDEO व्हायरल करत नेटकऱ्यांनी सदस्यांवर व्यक्त केला संताप

Avinash Mishra Disrespected Chahat Pandey : बिग बॉस 18 चा तिसरा आठवडा सुरु आहे. सध्या अविनाश मिश्रा खलनायकाच्या रुपात समोर येत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एन्ट्री करत अविनाश मिश्राने घरातील इतर सदस्यांच्या डोक्यावर चढत तांडव करायला सुरुवात केली. अविनाश मिश्रा दररोज घरातील सदस्यांशी पंगा घेताना आणि वाद घालताना दिसत आहे. यावेळी मात्र अविनाश मिश्राने हद्दच केली, ज्यावर प्रेक्षकही चांगले संतापल्याचं दिसत आहे. अविनाश मिश्राने चाहत पांडेबाबत अश्लील वक्तव्य केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका महिलेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, नॅशनल टेलिव्हिजनवर हे कसं काय दाखवलं जातं? असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Embed widget