Telly Masala : आयुष्मान खुरानाने मतदारांना केलं मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन ते बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) तरुण मतदारांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची नेमनुक केली. मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवणे आणि नागरिकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडताना मतदानाचा हक्क बजावणे हे ECI चे उद्दिष्ट आहे. आपल्या चित्रपटांद्वारे सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आव्हानात्मक निषिद्धांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, आयुष्मान खुरानाची तरुणांमधील लोकप्रियता तरुण मतदारांना त्यांच्या मताचे महत्त्व ओळखण्यासाठी प्रेरित करण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून पाहिले जाते. यावेळी त्याने X (पूर्वीचे ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) वर जाऊन महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात उद्या मतदान होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Chandu Champion Trailer Out : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. अभिनेत्याचा पहिला लूक पाहून चाहते आता चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumamachya Navan Changbhala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. बाळामामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार आहे. त्यामुळे मालिकेचा आगामी भाग पाहण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका 2018 मध्ये सुरू झाली होती. खूप कमी कालावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Janhvi Kapoor Photo Viral on Vulgur Sites : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सध्या आपल्या आगामी 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एक हृदयद्रावक किस्सा शेअर केला आहे. जान्हवीने खुलासा केला आहे की, वयाच्या 13 वर्षी तिचे काही फोटो अश्लील साईट्सवर व्हायरल झाले होते. धर्मा प्रोडक्शनने युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bollywood Actor : पोट भरण्यासाठी चित्रपटांत मार खायचा 'हा' सुपरस्टार, तिन्ही खानला करायचंय सोबत काम; ओळखलं का?
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनने नेहमीच आपल्या संघर्षातील दिवसांवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. काहीतरी करायची, नाव कमवायची धडपड नवाज करत असे. करिअरच्या सुरुवातीला नवाजला अनेक रिजेक्शन मिळत होते. नवाजुद्दीन जेव्हा म्हणायचा की एक दिवस मी मोठा स्टार होईल तेव्हा गाववाले त्याच्यावर हसायचे. नवाजुद्दीनने अनेक मुलाखतींत आपला संघर्ष आणि यशाबद्दल भाष्य केलेलं आहे.