एक्स्प्लोर

Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा

Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेत आता बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार आहे.

Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumamachya Navan Changbhala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. बाळामामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार आहे. त्यामुळे मालिकेचा आगामी भाग पाहण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका 2018 मध्ये सुरू झाली होती. खूप कमी कालावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर आपण बाळूमामांना वेगवेगळ्या रूपात पाहिले आहे. रसिकांनी बाळूमामांचे लहान वयातील रूप आणि तरूण वयातील रूप पाहिले आणि त्यांच्या उतार वयाच्या टप्प्यावरचे रूप ही अनुभवले. या सर्व रूपात प्रेक्षकांनी बाळूमामावर भरभरून प्रेमही केले आहे. आता प्रेक्षकांना बाळूमामांच्या आयुष्याच्या आठवणीतील आणि भूतकाळातील अशा काही गोष्टी बघायला मिळणार आहेत ज्या आत्तापर्यंत आपल्याला कोणालाच माहीत नव्हत्या.

बाळूमामांच्या आठवणीतला नवा अवतार 

उतारवयाच्या या टप्प्यावर बाळूमामांना जाणीव व्हायला लागली की, आपण एवढा प्रवास केला लोकांसाठी राबलो, आयुष्यात अनेक लोक आली आणि गेली. आता आपण एकटे  पडलो आणि ह्या सगळ्या आठवणींनीमुळे मामा रडायला लागले . मामांचे गुरु मुळे महाराज त्यांनी भेटून त्यांचे सांत्वन केले आणि मग त्या दोघांचा एकत्र प्रवास सुरु होतो. प्रवास करत असताना अक्कोळ गावाजवळ ते  आले  त्यांना काही माणसे भेटली आणि गावात येण्याची विनंती केली. त्यांनतर मामांना इथून पुढे भूतकाळाचे काही प्रसंग दिसू लागतात. भूतकाळामध्ये गेल्यावर त्यांना छोट्या मामांच्या आयुष्यातील पुढची कथा  उलगडायला सुरु होते.  जसे चंदूलालचा लोभीपणा,आईचा खाष्टपणा आणि प्रेमळ बायकोची मामावर असलेली माया आपल्याला पाहायला मिळेल.  

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

मामांच्या अशा अनेक चमत्कारिक प्रसंगाची मालिका सुरू होणार असून ती लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या रूपाने सादर होणार आहे. बाळूमामांच्या चरित्रगाथेत या कथेच्या निमित्ताने समर्थ पाटील ज्याने बालपर्वातील बाळुमामाची लोकप्रिय भूमिका साकार केली होती. तो मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहे. अष्टपैलू अभिनेते प्रकाश धोत्रे बाळूमामांची मुख्य भूमिका साकारत आहेत. या नव्या टप्प्यावर सुद्धा  बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक न पाहिलेले प्रसंग रसिकांना पहायला मिळतील.

संबंधित बातम्या

Sumeet Pusavale : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'नंतर आता 'या' मालिकेत दिसणार सुमीत पुसावळे! साकारणार 'ही' भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
Embed widget