एक्स्प्लोर

Telly Masala : 'भूलभुलैया 3' मध्ये विद्या बालनसह दिसणार धक् धक् गर्ल दिसणार ते सलग फ्लॉप देणाऱ्या कंगनाने आता हुकुमाचा एक्का काढला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bhool Bhulaiyaa 3 Movie : 'भूलभुलैया 3' मध्ये विद्या बालनसह दिसणार धक् धक् गर्ल! रुहबाबासोबत झळकणार 'ही' स्टार किड

Bhool Bhulaiyaa 3  Movie Vidya Balan :    हॉरर कॉमेडीपट असलेल्या 'भुलभूलैया ' चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.  'भुलभूलैया ' (Bhool Bhulaiyaa) चित्रपटाच्या सीरिजचा आता तिसरा भाग येणार आहे.  'भुलभूलैया -3' हा चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि विद्या बालन (Viday Balan) देखील असणार आहेत. त्याहून मोठं सरप्राइज म्हणजे या चित्रपटात 'धक् धक् गर्ल'  माधुरी दीक्षितदेखील (Madhuri Dixit) असणार असल्याचे वृत्त आहे.  आधीच्या दोन्ही भागांप्रमाणे आता 'भुलभूलैया -3' देखील बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

Tamil Director Accident Death :  9 दिवसांपासून बेपत्ता होता, आता नदीत मृतदेह सापडला; तामिळ दिग्दर्शकाचे अपघाती निधन

Tamil Director Accident Death :  मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळ दिग्दर्शकाचा (Tamil Movie Director) अखेर मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेत्री दुराईसामी ( वय 45) (Vetri Duraisamy) यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी (Himachal Pradesh Police) दिली. वेत्री दुराईसामी हे चेन्नईचे माजी महापौर सईदाई दुराईसामी यांचे चिरंजीव आहेत. वेत्री दुराईसामी हे  ज्या कारमधून प्रवास करत होते, त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. अपघातात वेत्री यांचे निधन झाले असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

Rashmi Desai On Ranveer Singh : असं वाटलं कोणीतरी कानशिलात लगावली; रणवीर-जॉनीच्या जाहिरातीवर 'टीव्ही क्वीन'चा संताप

Rashmi Desai On Ranveer Singh  Ad : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अॅडल्ट स्टार जॉनी सीन्स (Johnny Sins) यांनी नुकतीच लैंगिक समस्येवर एकत्रित जाहिरात केली. या जाहिरातीमुळे भारतात चर्चांना उधाण आले आहे. तर,  दुसरीकडे या जाहिरातीवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. ही जाहिरात एखाद्या टीव्ही सीरियलप्रमाणे चित्रीत करण्यात आली आहे. ही जाहिरात टीव्ही मालिका जगतासाठी, टीव्ही इंडस्ट्रीसाठी अपमानास्पद असल्याची संतापजनक प्रतिक्रिया छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashmi Desai) व्यक्त केली आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

Zee Marathi New Serial Paro and Shiva : नव्या मालिकांचा पहिलाच एपिसोड, 'झी मराठी'कडून मोठा ब्लंडर; प्रेक्षक म्हणाले, "तुम्ही वेडे झालायत?"

Zee Marathi New Serial Paro and Shiva :  छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून  वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातूनच काही  नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. 'झी मराठी'ने (Zee Marathi) 12 फेब्रुवारी रोजी दोन नव्या मालिका सुरू करण्याची घोषणा केली. या दोन नव्या मालिकांची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. मात्र, पहिल्याच दिवशी 'झी मराठी'कडून चूक झाली. त्यावर प्रेक्षकांनी थट्टा करत झी मराठीला प्रश्नही विचारले.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut : सलग फ्लॉप देणाऱ्या कंगनाने आता हुकुमाचा एक्का काढला; 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा झळकणार

Kangana Ranaut : अनेक दिवसांपासून एकामागून एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या कंगना रनौतने (Kangna Ranaut) आता हुकुमाचा एक्का  बाहेर काढला आहे. कंगनाला मागील काही चित्रपटांपासून बॉक्स ऑफिसवर अपयश पाहावे लागत आहे. आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा तिकीटबारीकडे वळवण्यासाठी कंगनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कंगनाने आता आर. माधवन (R. Madhavan) सोबत चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget