Rashmi Desai On Ranveer Singh : असं वाटलं कोणीतरी कानशिलात लगावली; रणवीर-जॉनीच्या जाहिरातीवर 'टीव्ही क्वीन'चा संताप
Ranveer Singh and Johnny Sins Ad : छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री रश्मी देसाईने रणवीर सिंग आणि जॉनी सीन्सच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे.
Rashmi Desai On Ranveer Singh Ad : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अॅडल्ट स्टार जॉनी सीन्स (Johnny Sins) यांनी नुकतीच लैंगिक समस्येवर एकत्रित जाहिरात केली. या जाहिरातीमुळे भारतात चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे या जाहिरातीवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. ही जाहिरात एखाद्या टीव्ही सीरियलप्रमाणे चित्रीत करण्यात आली आहे. ही जाहिरात टीव्ही मालिका जगतासाठी, टीव्ही इंडस्ट्रीसाठी अपमानास्पद असल्याची संतापजनक प्रतिक्रिया छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashmi Desai) व्यक्त केली आहे.
रश्मी देसाईने व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर रश्मीने म्हटले की प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून माझ्या करियरची सुरुवात झाली. त्यानंतर मी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोक त्याला छोटा पडदा म्हणतात. जिथे सामान्य लोक बातम्या, क्रिकेट आणि बॉलीवूड चित्रपट शोसह पाहतात. अजिबात अपेक्षित नसलेली ही जाहिरात रील पाहिल्यानंतर मला संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि टीव्हीसाठी काम करणाऱ्या लोकांचा हा अपमान असल्याची भावना मनात आली असल्याचे तिने म्हटले.
असं वाटलं कोणीतरी कानशिलात लगावली...
रश्मीने म्हटले की, नेहमी टीव्ही इंडस्ट्रीच्या लोकांना कमी लेखले जाते आणि तशीच वागणूक दिली जाते. प्रत्येकजण या इंडस्ट्रीत कठोर परिश्रम करतो. पण, टीव्ही मालिकांमध्ये असे काही दाखवले जात नाही. हे सगळं मोठ्या पडद्यावर, चित्रपटांमध्ये दाखवले जाते. वास्तव दाखवण्यात काहीच गैर नाही पण संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही रिॲलिटी चेक आहे. मला वाटलं कोणीतरी आपल्या कानशिलात लगावली आहे. मालिकांमधून आम्ही प्रेक्षकांना प्रेम आणि संस्कृती दाखवतो. टीव्हीमध्ये माझा सन्मानजनक प्रवास राहिला आहे आणि म्हणून मी दुखावले आहे.तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्याल अशी अपेक्षा असल्याची भावना अभिनेत्री रश्मी देसाईने व्यक्त केली.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री
रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री आहे. 'उत्तरन' या शोमधून त्याला नाव-प्रसिद्धी मिळाली. रश्मी देसाई बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. या शोमध्ये त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत होते. रश्मीने 'दिल से दिल तक', 'नच बलिए' सारखे शो देखील केले आहेत.
जॉनीची पहिली भारतीय जाहिरात
जॉनी सीन्सची ही पहिली भारतीय जाहिरात ठरली आहे. जॉनी सीन्स हा अॅडल्ट स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. जॉनी सीन्सने प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामच्या शोमध्ये हजेरी लावली होती. आता जॉनीने भारतीय जाहिरातीमध्ये काम केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.