एक्स्प्लोर

Telly Masala : प्रसिद्ध अभिनेता अयोध्येत ऐश्वर्यासोबत बांधणार लग्नगाठ ते थलापती विजयची राजकारणात एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Ayodhya : प्रसिद्ध अभिनेता अयोध्येत ऐश्वर्यासोबत बांधणार लग्नगाठ; राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशीच केला साखरपुडा

Arun ram gowda And Aishwarya: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अरुण राम गौडा (Arun Ram Gowda) आणि ऐश्वर्या यांनी 22 जानेवारी रोजी म्हणजेच राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी साखरपुडा केला. अरुण आणि त्याची होणारी पत्नी ऐश्वर्या हे एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ एकमेकांना डेट करत आहेत.  आता लवकरच अरुण राम गौडा  आणि ऐश्वर्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अरुण हा  भगवान श्री रामाचा भक्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अरुणनं सांगितलं की तो अयोध्येत (Ayodhya) ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Thalapathy Vijay : साऊथ स्टार थलापती विजय आता राजकारणात करणार एन्ट्री; लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेते आजवर सिनेक्षेत्राबरोबरच राजकारणातही आपली छाप सोडताना दिसले आहेत. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते.  दरम्यान आता थलापती विजयही (Thalapathy Vijay)  राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. थलापती विजय (Thalapathy Vijay) रजनीकांत आणि कमल हसन (Kamal Haasan) यांच्याप्रमाणेच राजकारणाच्या मार्गावर जाताना दिसतोय. यापूर्वीही दाक्षिणात्य अभिनेते राजकारणात उतरले. त्यांचा राजकारणातील इतिहास मोठा आहे. अभिनेते करुणानिधी यांनी सिनेक्षेत्रातून कारकिर्द सुरु केली. त्यानंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्री देखील झाले. पुढे त्यांनी तब्बल 5 वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sunny Leone : सनी लिओनीने सुरू केलं स्वत:चं हॉटेल, नाव आहे खूपच खास

Sunny Leone : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारी सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती 'स्प्लिट्सविला 15' हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. पण त्याआधीच तिने स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. सनी लिओनीच्या नव्या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; जाणून घ्या कधी आणि कुठे?

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Panchayat 3 OTT Release : 26 जानेवारीही गेली, आता 'पंचायत 3' वेब सीरीज कधी येणार? प्रेक्षकांची चातकासारखी वाट

Panchayat 3 : 'पंचायत 3' (Panchayat 3) या सीरिजची चाहते गेल्या काही दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत आहेत. सीरिजसंबंधित प्रत्येक अपडेट उत्सुकतेने जाणून घेत आहेत. 'पंचायत 3' ही बहुप्रतीक्षित सीरिज 26 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार असल्याच्या बातम्या होत्या. पण अद्याप ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget