Panchayat 3 OTT Release : 26 जानेवारीही गेली, आता 'पंचायत 3' वेब सीरीज कधी येणार? प्रेक्षकांची चातकासारखी वाट
Panchayat 3 : 'पंचायत 3' या सीरिजच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.
![Panchayat 3 OTT Release : 26 जानेवारीही गेली, आता 'पंचायत 3' वेब सीरीज कधी येणार? प्रेक्षकांची चातकासारखी वाट Panchayat 3 OTT Release Jitendra Kumar Most Popular Web Series Release Date Prime Video Jitendra Kumar Web Series Stream On Time Slot Amazon Prime Video Details Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Panchayat 3 OTT Release : 26 जानेवारीही गेली, आता 'पंचायत 3' वेब सीरीज कधी येणार? प्रेक्षकांची चातकासारखी वाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/27/5dc967ea9b2e3b1cc38fd15024f64be31706342903122254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Panchayat 3 : 'पंचायत 3' (Panchayat 3) या सीरिजची चाहते गेल्या काही दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत आहेत. सीरिजसंबंधित प्रत्येक अपडेट उत्सुकतेने जाणून घेत आहेत. 'पंचायत 3' ही बहुप्रतीक्षित सीरिज 26 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार असल्याच्या बातम्या होत्या. पण अद्याप ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.
'पंचायत 3' कधी येणार? (Panchayat 3 OTT Release)
'पंचायत'चा पहिला आणि दुसरा सीझन सुपरहिट झाला होता. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. 'पंचायत 2' सीरिज झाल्यापासूनच चाहते 'पंचायत 3'ची प्रतीक्षा करत आहेत. 'पंचायत 3'चं शूटिंग पूर्ण झालं असून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पण अद्याप या सीरिजची अधिकृत रिलीज डेट समोर आलेली नाही.
बॉलिवूड लाईफच्या बातमीनुसार, 'पंचायत 3' ही सीरिज 26 जानेवारी 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होती. 26 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 ते 12:30 च्या दरम्यान ही सीरिज रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण दुसरा दिवस उजाडला तरी ही सीरिज रिलीज झालेली नाही. चाहते वारंवार प्राईम व्हिडीओवर ही सीरिज झाली की नाही हे चेक करत आहेत. पण सीरिज रिलीज न झाल्याने ते नाराज झाले आहेत.
'पंचायत 3'मध्ये होणार मोठा धमाका
'पंचायत 3' या सीरिजचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी शेअर केला होता. या फोटोमध्ये सचिवच्या भूमिकेत झळकणारे अभिनेते जितेंद्र कुमार पाठीवर बॅग ठेऊन मोटरसायकलवरुन जाताना दिसले होते. तसेच त्यांच्या मोटरसायकलवर सामानदेखील बांधलेलं दिसलं होतं. त्यामुळे सचिव अभिषेक त्रिपाठीने फुलेरा सोडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
'पंचायत'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (Panchayat Starcast)
'पंचायत' सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या कौटुंबिक सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीता गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठव, पंकज झा, सुनीता राजवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता चाहते 'पंचायत 3' या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पंचायत 3'च्या रिलीज डेट संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण 2024 मध्ये ही सीरिज नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या
OTT Release This Week : रणबीर कपूरचा 'Animal' ते विकी कौशलचा 'सॅम बहादुर'; 'या' आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)