एक्स्प्लोर

Telly Masala : सिंघम आणि चुलबुल पांडे एकाच चित्रपटात ते अभिनेत्रीसोबत लैंगिक छळाची धक्कादायक घटना; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : सिनेमा आणि मालिका विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित आताच्या घडीच्या बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका

Chulbul Pandey in Singham Again : रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. तगड्या स्टारकास्टमुळे सिंघम अगेन चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉप आणि विलनच्या भूमिकेत अर्जून कपूर झळकणार आहे. आता या स्टारकास्टमध्ये बॉलिवूडमधील आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Salman Khan Salim Khan : लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू

Salman Khan Father Saleem Khan Thereaten :  बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान याच्या घराबाहेर एप्रिल महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना अटक केली. आता, सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली आहे. सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'मी शाळेत जात असताना त्याने मला प्रायव्हेट पार्ट दाखवला', अभिनेत्रीसोबत लैंगिक छळाची धक्कादायक घटना

Me Too Movement : गेल्या काही दिवसांपासून कोलकाता रेप मर्डर प्रकरण खूप चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत याबद्दल भूमिका मांडली होती. आता अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या लैंगिक छळाच्या घटनेवर भाष्य केलं आहे. सेलिना जेटलीने मोठा धक्कादायक खुलासा करत सांगितलं की, शाळकरी वयातच तिला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. शाळेत असताना अनेक मुलं तिची छेड काढायचे, कॉलेजमध्ये असताना मुले तिच्या स्कूटीवर अभद्र मेसेज असलेल्या चिठ्ठ्या लिहायचे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Abdu Rozik : 'छोटा भाईजान'च्या आयुष्यात मोठी उलथापालथ, सुरु होण्याआधीच संपलं नातं; अब्दू रोजिकने मोडला साखरपुडा

Abdu Rozik Calls Off Wedding : बिग बॉस 16 मध्ये झळकलेला ताजकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने (Abdu Rozik) साखरपुडा मोडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी अब्दूने त्याच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. लवकरच लग्न करणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. आता अब्दूनं साखरपुडा मोडल्याचं समोर येत आहे. अब्दूने यावर्षी 24 एप्रिल रोजी मजलिस शारजाह येथे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. त्यानंतर लवकर लग्न करणार असल्याची घोषणाही केली होती. मात्र, आता हे लग्न मोडलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi : संग्राम वैभवपेक्षा पण बैल निघाला, अरे हा तर अरबाज 3; प्रेक्षक वाइल्ड कार्ड सदस्यावर नाराज

Bigg Boss Marathi Contestant : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये टीम बीतील सदस्यांची संग्रामवर नाराजी पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घराता वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतलेला अरबाज मिस्टर इंडिया बनल्याचं दिसत आहे. संग्राम चौगुलेचा बिग बॉस मराठीच्या घरात सहभागच दिसत नाहीय. घरात आल्यावर पहिल्या दिवशी संग्राम अरबाजला भिडला होता. मात्र, त्यानंतर संग्रामही काही खास करताना दिसत नाहीय. टास्कमध्येही तो अरबाजविरोधात उभं राहताना किंवा संपूर्ण शक्तीनिशी टास्क खेळताना दिसत नाहीय. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले माइल्ड कार्ड निघाल्याने प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Salman Khan : पाईपवर चढून एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रुममध्ये जायचा सलमान, संगीता बिजलानीने रंगेहाथ पकडलं

Salman Khan Relationship : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सलमान खानचं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होतं. यामध्ये ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, संगीता बिजलानी आणि सोमी अली या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. पण, फक्त अफेअर नाही, तर सलमान खान एका अभिनेत्रीसोबत लग्नही करणार होता. लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या, पण सलमानचं लग्न मोडलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Operation Hawkeye : तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर; अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
अमेरिकेचा सीरियावर मोठा हवाई हल्ला; तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
Indranil Naik : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
R. Madhavan On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
Pune News: तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री, फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष
तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री, फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष
Embed widget