एक्स्प्लोर

Tejaswini Pandit : "18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची" राज ठाकरेंचा फोटो शेअर करत काय म्हणाली तेजस्विनी पंडित?

Tejaswini Pandit on MNS Vardhapan Din : मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचा (Raj Thackeray) फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

Tejaswini Pandit on Maharashtra Navnirman Sena Vardhapan Din : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आज 18 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. 

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट (Tejaswini Pandit Post)

तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक फोटो इंस्टास्टोरीवर शेअर केला आहे. राज ठाकरेंचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची... पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा". तसेच तिने '#वर्धापनदिन' दिला आहे.

Tejaswini Pandit :

तेजस्विनी पंडित अनेकदा राज ठाकरे किंवा मनसेसंबंधित (MNS) पोस्ट शेअर करत असते. अनेक मुलाखतींमध्ये तिने राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी टोल वाढीवरुन (Toll Agigation) मनसे आक्रमक झाले होते. त्यावेळी तेजस्विनीनेही आवाज उठवला होता.

राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट (Tejaswini Pandit on Raj Thackeray)

राज ठाकरेंच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितने खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने लिहिलं होतं,"आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्ष झाली आपल्या परिचयाला. पण संवाद कदाचित हल्लीच झाला. तुमचं खुप कौतुक वाटतं मला...इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व... राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता". 

तेजस्विनीने लिहिलं होतं,"स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात...इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत... राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत! हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे...कारण कर नाही त्याला डर कशाला!". 

तेजस्विनीने पुढे लिहिलं होतं,"राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो". 

संबंधित बातम्या

पेशन्स ठेवा ते माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवणार, राज ठाकरे यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaSpecial Report | Ajit pawar Budget | अर्थसंकल्पात कवितांची मैफल,दादांच्या कवितांनी उपस्थितांचं मनोरंजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Embed widget