Taapsee Pannu : संसार कधी थाटणार? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत तापसी पन्नू म्हणाली,"मी अजून प्रेग्नेंट नाही"
Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतचं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) काही वर्षांपासून आपल्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. लवकरच ती शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'डंकी' (Dunky) या सिनेमात झळकणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या सिनेमांमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असणारी तापसी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. नुकतचं तिने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
तापसी पन्नू सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन घेतलं आहे. शाहरुखनंतर तापसीचं 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन चांगलच गाजलं आहे. तापसीला चाहत्यांनी आगामी सिनेमासंदर्भात तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. या खास सेशनमध्ये तापसीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
तापसी पन्नू लग्न कधी करणार? (Tapsee Pannu Wedding Update)
अभिनेत्री तापसी पन्नू लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता 'आस्क मी एनीथिंग' या सेशनमध्येही तापसीने लग्नासंदर्भात भाष्य केलं आहे. एका चाहत्याने तापसीला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला आहे. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"मी अजून प्रेग्नंट नाही... त्यामुळे सध्यातरी लग्नाचा विचार केलेला नाही". तसेच या प्रश्नाचं उत्तर देताना तापसीला हसू अनावर झालं. चाहत्याच्या प्रश्नाचं भन्नाट उत्तर दिल्यामुळे तापसी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'आस्क मी एनीथिंग' या सेशनदरम्यान तापसी पन्नू म्हणाली,"सोशल मीडियावर सध्या नकारात्मक वातावरण आहे, असं मला वाटतं. ट्रोलिंग होत आहे. एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत".
तापसीकडे सिनेमांची रांग (Taapsee Pannu Movies)
तापसी पन्नूने 'पिंक', 'जुडवा 2' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षी अभिनेत्रीचे जवळपास सहा सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunky) या सिनेमाच्या माध्यमातून तापसी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'एलियन' (Alien) या तामिळ सिनेमातही ती झळकणार आहे. या सिनेमात ती कोणत्या भूमिकेत झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. तसेच 'वो लडकी हैं कहां', 'फिर आई हसीन दिलरुबा' आणि 'जन गण मन' हे तिचे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या
Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
