एक्स्प्लोर

Swatantrya Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय मराठमोळ्या ऐश्वर्याचं मोठं योगदान; जाणून घ्या रणदीपच्या सिनेमाच्या Unseen गोष्टी

Swatantrya Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं सेट ड्रेसिंग ऐरोलीत राहणाऱ्या 24 वर्षीय ऐश्वर्या बाचालने (Aishwarya Bachal) केलं आहे.

Swatantrya Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली आहे. पण या चित्रपटाचा भाग असलेल्या प्रत्येकाने तेवढीच मेहनत, अभ्यास आणि रिर्सच केल्याचं समोर आलं आहे. ऐरोलीत राहणाऱ्या 24 वर्षीय मराठमोळ्या ऐश्वर्या बाचलने (Aishwarya Bachal) या सिनेमाचं सेट ड्रेसिंग केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा तिचा पहिलाच बॉलिवूडपट आहे. पहिल्या बिग बजेट आणि एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमासाठी ऐश्वर्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान तिला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल एबीपी माझाशी बोलताना ऐश्वर्या बाचल म्हणाली,"स्वातंत्र्यवीर सावरकर' हा नियतकालिक चित्रपट आहे. त्यामुळे या सिनेमासाठी रिसर्च खूप महत्त्वाचा होता. तसेच टीम वर्कमुळे हा सिनेमा शक्य झाला आहे. प्रोडक्शन डिझायनर निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा सिनेमा केला आहे. आर्ट डिरेक्टर सचिन पाटील, समिधा भोळे, प्रतीक बडगुजर या सर्वांनी मला मदत केली. शेवटपर्यंत आमचा या सिनेमावर रिसर्च सुरू होता. प्रत्येक गोष्टीचा रिफरेन्स रणदीप हुड्डा यांना हवा असायचा".

Swatantrya Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय मराठमोळ्या ऐश्वर्याचं मोठं योगदान; जाणून घ्या रणदीपच्या सिनेमाच्या Unseen गोष्टी

'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या शूटिंगदरम्यान रणदीप हुड्डा सरांनी रडवलंय : ऐश्वर्या बाचाल

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या शूटिंगबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली,"शूटिंगदरम्यान सेटवर खूप गोंधळ असायचा. रणदीप हुड्डा सेटवर यायचे तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त सावरकरांचा विचार सुरू असायचा. ते सेटवर आले की सावरकरच आले आहेत, असं सेटवरील सर्वांना वाटायचं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये रणदीप हुड्डा यांचं लक्ष असायचं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचं शूटिंग प्रामुख्याने मुंबईत झालं आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली ट्रेन आम्ही सेटवरच बनवली आहे. रणदीप हुड्डा सरांनी सेटवर रडवलंदेखील आहे. त्यांना हवं तसं काम त्यांनी करुन घेतलं आहे. रणदीप हुड्डा आल्यावर सेटवर भीतीदायक वातावरण होतं. ते सेटवर आल्यावर त्यांना सावरकरांचं ऑफिस वाटलं पाहिजे, त्यांना सावरकरांचं घर वाटलं पाहिजे, याचा आमच्या डोक्याच विचार सुरू असायचा". Swatantrya Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय मराठमोळ्या ऐश्वर्याचं मोठं योगदान; जाणून घ्या रणदीपच्या सिनेमाच्या Unseen गोष्टी

ऐश्वर्याला आर्ट डिरेक्शनची गोडी कशी निर्माण झाली? 

आर्ट डिरेक्शन हे करिअर निवडण्याबाबत ऐश्वर्या म्हणते,"कॉलेजमध्ये असताना एकांकिकांसाठी मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्यावेळी सेटचं आकर्षण निर्माण झालं. कलेवरच्या प्रेमामुळे मी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुढे गाणी, वेब फिल्म, लोढा मार्केटिंग अशा अनेक गोष्टींसाठी कामे केली. दरम्यान राकेश कदम यांच्यासोबत माझी ओळख झाली. 'पांडू', 'हर हर महादेव' असे चित्रपट केले.दरम्यान निलेश सरांनी माझं प्रोईल पाहिलं आणि विश्वास दाखवला. माझं कॉलेज किंवा शिक्षण आर्टमध्ये झालेलं नाही. पण कलेवरचं प्रेम पाहून त्यांनी मला या सिनेमासाठी विचारणा केली. आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगमी सिनेमावर लवकरच काम सुरू करणार आहे".

संबंधित बातम्या

Randeep Hooda : "सिनेमा बनवण्यासाठी घर विकलं, 30 किलो वजन कमी केलं"; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  1 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Ajit Pawar Bag Checking : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी,बॅगेत सापडल्या चकल्याJustice KU Chandiwal : निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचे ABP Majhaवर गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Embed widget