Swatantra Veer Savarkar : काळ्या पाण्याची शिक्षा ते सेल्युलर जेलमधील छळ; अंगावर शहारे आणणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा टीझर आऊट
Randeep Hooda : रणदीप हुड्डाच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Swatantra Veer Savarkar Teaser : रणदीप हुड्डाच्या आगामी बहुचर्चित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरनंतर प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या टीझरमध्ये काय आहे?
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाच्या टीझरमध्ये रणदीप हुड्डा (Randeep Hooda) वीर सावरकरांच्या (Swatantra Veer Savarkar) भूमिकेत दिसून आला. हा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सावरकरांना मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा, सेल्युलर जेलमध्ये त्यांचा झालेला छळ अशा अनेक गोष्टींची झलक 'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच टीझरमध्ये महात्मा गांधी यांचा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
रणदीप हुड्डाने शेअर केला 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा टीझर (Randeep Hooda Shared Swatantra Veer Savarkar Teaser)
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक... इंग्रजांनाही सर्वात जास्त भीती वाटायची असं व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य आणि इतिहास जाणून घ्या... 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे".
'स्वातंत्र्यवीर सावरकर' यात अभिनयासोबतच रणदीपनं या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा रणदीपच्या लूकची खूप चर्चा झाली होती. पण आता या टीझरमधील झलक पाहून प्रेक्षक आणखी उत्सुक झाले आहेत. तसेच या सिनेमातील संवादही उत्तम असणार याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आणि खुदीराम बोस यांसारख्या क्रांतिकारकांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचं टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्र, अंदमान निकोबार आणि लंडनध्ये झालं आहे. अभिनेता रणदीप हुड्डाचा हा दुसरा बायोपिक आहे. याआधी त्याने 'सरबजीत' हा बायोपिक केला होता.
संबंधित बातम्या