स्वरा भास्कर होणार आई; पती फहाद अहमदसोबतचे फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
नुकतीच स्वरानं (Swara Bhasker) खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Swara Bhasker Pregnancy: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) 16 फेब्रुवारीला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांना दिली होती. स्वरानं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करुन तिच्या आणि फहादच्या कोर्ट मॅरेजची माहिती चाहत्यांना दिली. आता लवकरच स्वरा आणि फहाद हे आई-बाबा होणार आहेत. नुकतीच स्वरानं खास पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
स्वरानं शेअर केले खास फोटो
स्वरानं सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोला स्वरानं कॅप्शन दिलं, 'कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला मिळतात! धन्य, कृतज्ञ आणि उत्साही भावनांनी आम्ही नवीन जगात पाऊल ठेवले आहे.'
View this post on Instagram
स्वरा भास्करने ही गुडन्यूज दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा आणि फहादच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.'
स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वरा आणि फहादचे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या:
Swara Bhasker: स्वराची खास पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली, 'फहादचा जोडीदार, बेस्ट सौतन'