Swara Bhaskar : 'कानशिलातच पडलीये आणि जिवंत आहे ना...', कंगनाच्या विमानतळ प्रकरणावर स्वरा भास्करने व्यक्त केलं स्पष्ट मत
Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर हीने नुकतच कंगनाला कानशिलात लगावल्या प्रकरणी तिचं स्पष्ट व्यक्त केलं आहे.
Swara Bhaskar : चंदीगढ विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौतला (Kangna Ranaut) एका सीएसआयएफ जवानाने कानशिलात लगावली. त्यानंतर कंगनाने तिच्या सोशल मीडियावर यासंदर्भात भाष्य केलं. त्यातच तिने तिला बॉलीवूडमधून कोणत्याही प्रकाराच पाठिंबा मिळत नसल्याचंही म्हटलं. पण तरीही अनेक बॉलीवूड कलाकारांनी या घटनेचा तीव्र निषेध करत तिला पाठिंबा दिला होता. अभिनेत्री स्वरा भास्कराचा (Swara Bhaskar) देखील त्यामध्ये समावेश होता.
दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हीने नुकतच कनेक्ट सीनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. कंगनासोबत झालेल्या घटनेचं तिने समर्थन केलं नाही पण कंगनाच्या भूमिकेवर मात्र स्पष्ट मतं मांडली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कंगनासोबत हा प्रकार घडला. त्यामुळे सोशल मीडियावरही या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळालं.
स्वरा भास्करने काय म्हटलं?
कंगनाच्या प्रश्नावर उत्तर देताना स्वरा भास्करने म्हटलं की, 'मला असं वाटतं की जे झालं ते अत्यंत चुकीचं होतं, त्याचं कोणीही समर्थन करु शकत नाही. त्यामुळे कंगनासोबत जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं आणि ते तसं व्हायला नको होतो. या घटनेनंतर लोक कंगनाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना सांगत होते की, त्यांनी याबद्दल बोलू नये, कारण तेच लिंचिंगचं समर्थन करतात. जे तिच्याबाबतीत घडलं ते घडायला नकोच होतं. म्हणजे असं कोणाबाबत होऊ नये, पण तिच्या फक्त कानशिलातच पडली आहे,ती जीवंत आहे ना. तिच्या अवतीभोवती सुरक्षा तिची सुरक्षा आहे. पण या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी त्यांचं आयुष्य गमावलं आहे. जमावाने मारहाण करुन त्यांचे जीव घेतले आहेत, काहींना तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रेनमध्ये गोळ्या घालून मारलंय. दंगलीत, सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना आहे. मग हे या सगळ्या गोष्टींचं समर्थन करणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. '
कंगनाने हिंसेंचं समर्थन केलंय - स्वरा भास्कर
कंगनानेच तिच्या प्लॅटफॉर्मवरुन अशा अनेक गोष्टींचं समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथची पाठराखण करत ख्रिस रॉकलला कानशिलात लगावलेल्या प्रकरणाची पाठराखण केली होती. त्यामुळे कंगनाने स्वत:तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत. त्यासाठी तिला ट्विटरने अनेकवेळा बॅन देखील केलंय, असंही स्वराने म्हटलं.